भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा २१५ धावा केल्या. मोहम्मद सिराजने या सामन्यात ३ बळी घेतले. या सामन्यात कमबॅक मॅन कुलदीप यादवनेही ३ बळी घेतले. भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकनेही आपल्या नावावर २ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेला स्वस्तात कव्हर करण्यात या तीन गोलंदाजांव्यतिरिक्त अक्षर पटेलचे महत्त्वाचे योगदान होते. अक्षरने तीन झेल घेतले आणि एक विकेटही घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मोहम्मद सिराजने फार कमी वेळात संघात आपले स्थान पक्के केले. त्याला कसोटी आणि एकदिवसीय संघात सातत्याने संधी मिळत आहेत आणि तो आपली छाप सोडण्यातही यशस्वी होत आहे. त्यांच्या कामगिरीच्या आकडेवारीवरूनही याची पुष्टी होत आहे.

गोलंदाजीविषयी मोहम्मद सिराज काय म्हणाला?

श्रीलंकेच्या फलंदाजीनंतर इनिंग ब्रेकमध्ये मोहम्मद सिराजने समालोचक संजय मांजरेकर यांच्याशी संवाद साधला. सिराज म्हणाला, “मी सहसा सुरुवातीला चेंडू स्विंग कसा होईल यावर लक्ष केंदित करतो. मग मी चेंडू कसा स्विंग होईल यासाठी प्रयत्न करत होतो. पण पहिल्या षटकानंतर यष्टीरक्षक केएल राहुलने सांगितले की चेंडू स्विंग होत नाही. यानंतर मी माझा प्लॅन बदलला.”

हेही वाचा: IND vs SL 2nd ODI: ईडन गार्डनवर दिसली कुलदीपची जादू! ‘शतकवीर’ शनाकाला बोल्ड करत मोडले अनेक विक्रम

मोहम्मद सिराजने सांगितले की, “स्विंग न मिळाल्याने त्याने गोलंदाजीत बदल करत फलंदाजापासून तो थोडा खेचला आणि मग मला त्यात यश आले. ती एकदा लय निर्माण झाली आणि मग विकेट्सही मिळाल्या.” या सामन्यात सिराजने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने अविष्का फर्नांडोला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. सिराजने श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या दोन विकेट्सही घेतल्या. अशाप्रकारे त्याने श्रीलंकेची धावसंख्या २१५ संपुष्टात आणली. सिराजने गेल्या सामन्यातही २विकेट्स घेतल्या होत्या.

पॉवरप्लेमध्ये सिराजचे आकडे अप्रतिम आहेत

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे पॉवरप्लेचे आकडे विलक्षण आहेत. आकडेवारीनुसार मोहम्मद सिराजने १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७८ षटके टाकली आहेत. मोहम्मद सिराजने या १७ सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये १९ खेळाडूंना आपला बळी बनवले आहे. या दरम्यान, वेगवान गोलंदाजाची इकॉनमी ३.८ आहे. मोहम्मद सिराजची इकॉनमी हे सिद्ध करते की तो केवळ विकेट घेत नाही तर या गोलंदाजाविरुद्ध धावा करणे फलंदाजांसाठी सोपे नाही. मात्र, आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी मोहम्मद सिराजचे आकडे हे टीम इंडियासाठी चांगले संकेत आहेत.

हेही वाचा: Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था…”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ, पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना वापरले अपशब्द

बांगलादेशपाठोपाठ श्रीलंकेविरुद्धही कामगिरी अप्रतिम आहे

गेल्या महिन्यात, बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने २२च्या सरासरीने आणि ५.२८ च्या इकॉनॉमीने एकूण ६ विकेट्स घेतल्या. यानंतर, श्रीलंकेविरुद्धच्या चालू मालिकेत त्याने २ सामन्यांच्या २ डावात १२ च्या सरासरीने आणि ४.७३ च्या इकॉनॉमीने ५ विकेट्स घेतल्या आहेत. या नेत्रदीपक आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने आगामी विश्वचषकासाठी आपली दावेदारी मांडली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 2nd odi due to rahuls advice siraj changed the plan and sri lankan batsmen got confused and threw wickets avw