India vs Sri Lanka 2nd ODI Match Updates: भारत आणि श्रीलंका संघांत वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २१५ धावा केल्या. श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. नवोदित नुवानिंदू फर्नांडोने शानदार अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारतीय संघाला २१६ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी जबरदस्त गोलंदाजी केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने २९ धावांवर पहिली विकेट गमावली. अविष्का फर्नांडो ६ षटकात २० धावा काढून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. नुवानिंदू फर्नांडोने आपला पदार्पण सामना खेळताना, कुसल मेंडिस (३४) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या.
१०३ धावांवर धनंजय डी सिल्वा खातेही न उघडता बाद झाला. नुवानिंदू अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला. तो ५० धावा केल्यानंतर ११८ धावांवर झाला. २३व्या षटकात कुलदीप यादवने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला बाद करून मोठा धक्का दिला. शनाका २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चारिथ अस्लंकाने १५ धावा केल्या.
खालच्या क्रमाकांवरी फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. ज्यामध्ये दुनिथ वेलालगेने ३२, वनिंदू हसरंगाने २१ आणि चमिका करुणारत्नेने १७ धावा केल्या. कसून रजिथाही १७ धावा करून नाबाद राहिली. भारताच्या मोहम्मद सिराजने आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
सिराज आणि कुलदीपच्या प्रत्येकी ३ विकेट्स –
वेगवान गोलंदाज मोहम्म्द सिराजने ५.४ षटकांत ३० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कुलदीप यादवेने देखील १० षटकांत ५१ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. तसेच उमरान मलिकने २ आणि अक्षऱ पटेलने एक विकेट घेतली.