भारत आणि श्रीलंका संघांत दुसरा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने ६ बाद २०६ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला २०७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली नाही. ज्याचा फटका भारतीय संघाला बसला. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप नकोसा विक्रम केला.
अर्शदीपने केली नो बॉलची हॅटट्रिक –
संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकात फक्त २ धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र अर्शदीप गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर श्रीलंका संघ पाच धावा करू शकला. पण शेवटचा एक चेंडू राहिला असताना अर्शदीपने लागोपाठ तीन नो बॉल टाकले. पहिल्या नो बॉलवर श्रीलंकन सलामीवीर कुसल मेंडिस एकही धाव घेऊ शकला नाही.
भारतीय संघाने आपल्या डावात तब्बल ७ नो बॉल टाकले –
पण दुसऱ्या नो बॉलवर त्याने चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या नो बॉलवर मेंडिसने षटकार मारला आणि संघाची धावसंख्या २१ पर्यंत नेली. मात्र, अर्शदीप सिंग टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. पंरतु आजच्या सामन्यात त्याने एकूण ५ नो बॉल टाकले. त्याचबरोबर त्याने ४ षटकांत ३७ धावा दिल्या एकही विकेट मिळवली नाही. भारतीय संघाने आपल्या डावात तब्बल ७ नो बॉल टाकले ज्याचा फटका भारतीय संघाला बसला.
हेही वाचा –IND vs SL 2nd T20: उमरान मलिकच्या घातक चेंडूवर भानुका राजपक्षे झाला बोल्ड, व्हिडिओ होतोय व्हायरल
श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २०६ धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने नाबाद ५६ धावा केल्या. त्याचबरोबर कुसल मेंडिसने ५३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना उमरान मलिकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलने २ विकेट्स घेतल्या.