Axar Patels Reaction on Rahul Tripathi: गुरुवारी राहुल त्रिपाठीच्या प्रतिक्षेचा क्षण संपला. तो टीम इंडियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यात यशस्वी झाला आहे. जरी त्याचे स्वप्नवत पदार्पण काही खास नव्हते. लक्ष्याचा पाठलाग करताना, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र कोणताही विशेष करिष्मा न दाखवता केवळ पाच धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनचा रस्ता धरला. पण त्याने क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली. ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
क्षेत्ररक्षणात चमकला राहुल त्रिपाठी –
याआधी तो संघासाठी क्षेत्ररक्षणात जबरदस्त चमकला. त्याने सीमारेषेजवळ एक अप्रतिम झेल घेतला. या क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरे तर १२व्या षटक अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल भारतीय संघासाठी घेऊन आला होता. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर निसांकाने मिड-विकेटवर जोरदार फटका लगावला. मात्र सीमारेषेजवळ तैनात असलेल्या राहुलने लांबपर्यंत धावत जात हा झेल पकडला.
दरम्यान, त्याने आनंदात दोन्ही हात उंचावून सेलिब्रेशन केले, पण मैदानावरील पंचांना तो षटकाराचा इशारा देत असल्याचे वाटले. त्याचबरोबर त्रिपाठीच्या या कृत्याने फलंदाज, गोलंदाज आणि पंच देखील चक्रावले. कारण त्यांनी झेल पकडल्यानंतर दोन्ही हात उंचावले होते. त्यामुळे काही वेळासाठी सर्वच गोंधळले होते. त्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाचा आधार घेतला. जिथे निसांका बाद असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा – Asia Cup 2023: पीसीबीचे प्रमुख नजम सेठींची जय शाहांवर बोचरी टीका; म्हणाले, ‘ते पीएसएलचे वेळापत्रकही जाहीर …’
त्रिपाठीच्या या कृत्याने गोलंदाज अक्षर पटेल देखील गोंधळला. त्याला नक्की समजेना षटकार गेला आहे की झेल पकडण्यात आला आहे. त्याचा देखील गोंधळलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा पराभव:
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पुण्यात नाणेफेक हारल्यानंतर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी निर्धारित षटकात सहा गडी गमावून २०६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारित षटकांत ८ बाद गडी गमावून केवळ १९० धावाच करू शकला. दरम्यान खालच्या फळीतील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी संघासाठी दमदार अर्धशतके झळकावली. असे असतानाही भारतीय संघाचा केवळ १६ धावांनी विजय हुकला.