भारत आणि श्रीलंका संघात दुसरा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर प्रथम फलंदाजीसाठी श्रीलंका संघाला आमंत्रित केले. या सामन्यात वेगवान गोलंदाज भानुका राजपक्षेचा शानदार त्रिफळा उडवला. हा श्रीलंका संघासाठी दुसरा धक्का होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमराने मलिकने आपल्या वेगवान चेंडूने भानुका राजपक्षेला चकवा दिला. राजपक्षेला चेंडू समजण्या अगोदर स्टंपच्या बेल्स उडाल्या होत्या. उमरान मलिकने भानुकाला १० व्या षटकांच्या पहिल्या चेंडूवर अवघ्या २ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
८२ धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची पहिली विकेट पडली होती. युझवेंद्र चहलने कुशल मेंडिसला पायचित केले. मेंडिसने ३१ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. नऊ षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर ८३ अशी आहे.
श्रीलंकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला –
१३८ धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. उमरान मलिकने असलंकाला शुभमन गिलकरवी झेलबाद करून श्रीलंकेला पाचवा धक्का दिला. असलंकाने १९ चेंडूत ३७ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार षटकार लगावले.