IND vs SL 2nd T20 Updates: श्रीलंका आणि भारत संघांत तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाने भारतावर १६ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या विजयात कर्णधार दासुन शनाकाने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याने २२ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांसह ५६ धावांची नाबाद खेळी खेळली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शनाकाने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ६ बाद २०६ धावा केल्या. एकवेळ श्रीलंकेचा संघ ६ विकेटवर १३८ धावा करून संघर्ष करत होता. शनाकाने करुणारत्नेसोबत सातव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ८ बाद १९० धावाच करता आल्या.

IND vs NZ 1st Test Match Updates in Marathi
IND vs NZ : भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन मोठे बदल, शुबमनच्या जागी द्विशतकवीरला दिली संधी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
New Zealand vs India first test match predict rain sport news
भारताचेच पारडे जड; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट
IND vs BAN T20 Highest Score with India Scoring 200 Plus Runs Most Often in Mens T20I Cricket
IND vs BAN: टीम इंडियाने सर्वात मोठ्या धावसंख्येसह केला विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
IND vs BAN 1st T20 Match Hardik Pandya broke Virat Kohlis record for most match winning sixes in T20I
Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19
Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक
IND vs BAN Rohit Sharma Take Bold Decision After Winning Toss to Bowl First in India After 9 Years Kanpur Test
IND vs BAN: रोहित शर्माचा दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत चकित करणारा निर्णय, ९ वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना

श्रीलंकेसाठी सर्वात वेगवान अर्धशतक –

शनाकाने आपल्या झंझावाती अर्धशतकाद्वारे दोन मोठे विक्रम केले. तो श्रीलंकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने माजी दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना मागे टाकले आहे, ज्यांनी आतापर्यंत श्रीलंकेसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. जयवर्धने आणि संगकाराने २१-२१ चेंडूत अर्धशतक झळकवले होते. जयवर्धनेने २००७ मध्ये जोहान्सबर्गमध्ये केनियाविरुद्ध, तर २००९ मध्ये संगकाराने नागपुरात भारताविरुद्ध ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND vs SL 2nd T20: अक्षर-सूर्याची झुंजार खेळी अपयशी! श्रीलंकेची भारतावर १६ धावांनी मात, मालिकेत १-१ अशी बरोबरी

भारताविरुद्ध प्रथमच असे झाले –

शनाकाने २५४.५५च्या स्ट्राईकसह त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. तसेच तो भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५०+ च्या स्ट्राइक रेटने ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, शनाकाने भारताविरुद्धच्या गेल्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे. तीन वेळा नाबाद राहताना त्याने एकूण २५५ धावा केल्या आहेत. त्याने नाबाद ४७, नाबाद ७४, नाबाद ३३, ४५ आणि आज ५६ धावांची खेळी खेळली.