पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला १६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियासमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य होते, मात्र भारतीय संघ आठ बाद १९० धावाच करू शकला. या विजयासह पाहुण्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक सामना ७ जानेवारी (शनिवार) रोजी राजकोटमध्ये खेळवला जाईल. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या टी-२०मधील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने वेदना व्यक्त केल्या. हार्दिक म्हणाला की, पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये खराब कामगिरी केली. हार्दिक पांड्याला विश्वास आहे की त्याच्या संघाने मूलभूत चुका केल्या, ज्या या स्तरावर व्हायला नको होत्या.

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ”पॉवरप्लेमुळे गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये आम्ही खराब कामगिरी केली. आम्ही साध्या चुका केल्या ज्या आम्ही या पातळीवर करू नयेत. आपण ज्या मूलभूत गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो, ते शिकले पाहिजे. तुमचा दिवस वाईट असू शकतो परंतु मूलभूत गोष्टींपासून दूर जाता कामा नये. या परिस्थितीत हे खूप कठीण आहे.”

नो-बॉल टाकणे हा गुन्हा: हार्दिक

भारताने दुसऱ्या टी-२० मध्ये एकूण १२ अतिरिक्त धावा दिल्या, त्यात अर्शदीप सिंगच्या पाच नो-बॉलचा समावेश होता. या वेगवान गोलंदाजाने यापूर्वीही नो-बॉल टाकल्याची आठवण हार्दिक पांड्याने करून दिली. नो-बॉल फेकणे हा गुन्हा आहे हे सांगण्यासही हार्दिकने कमीपणा दाखवला नाही. पांड्या म्हणाला, ”अर्शदीपने यापूर्वीही नो-बॉल टाकले आहेत. हे कुणाला दोष देण्याबद्दल नाही, तर नो-बॉल टाकणे हा गुन्हा आहे.”

हेही वाचा – IND vs SL 2nd T20: दासुन शनाकाने झंझावाती अर्धशतकाद्वारे रचला मोठा विक्रम; भारताविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

हार्दिकने केली सूर्याची स्तुती –

भारतीय कर्णधाराने सूर्यकुमार यादवचेही कौतुक केले, ज्याने अक्षर पटेलसोबत सहाव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. त्याने नवोदित राहुल त्रिपाठीला सूर्यकुमारच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर का पाठवले, असे विचारले असता, पंड्या म्हणाला की, मला त्रिपाठीला त्याला सोयीची भूमिका द्यायची होती. हार्दिक पांड्या म्हणाला, ”सूर्याने चौथ्या क्रमांकावर चमकदार कामगिरी केली. संघात जो कोणी येईल, तुम्हाला (त्रिपाठी) त्याला अशी भूमिका द्यायची आहे, जी त्याच्यासाठी सोयीस्कर असेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 2nd t20 hardik pandya said fundamental errors and no balls were the main reasons for the defeat vbm