भारत आणि श्रीलंका संघात दुसरा टी-२० सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी श्रीलंका करताना ६ बाद २०६ धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला २०७ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात भारतीय संघाने अनेक चुका केल्या आहेत. ज्याचा फटका भारतीय संघाला बसला.
सर्वात प्रथम हार्दिकने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यान सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण पुण्याच्या खेळपट्टीचा इतिहास पाहिला, तर येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा वरचष्मा आहे. मग पांड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? प्रश्न उपस्थित होत आहे. हार्दिकच्या या निर्णयामुळे चाहत्यांना नक्कीच थोडे आश्चर्य वाटले आहे. क्षेत्ररक्षण निवडण्याच्या निर्णयावर हार्दिकने दिलेली प्रतिक्रिया अधिक आश्चर्यकारक होती.
नाणेफेक करण्यासाठी आलेल्या मुरली कार्तिकने हार्दिकला त्याच्या निर्णयाबद्दल विचारले, तेव्हा क्षेत्ररक्षण निवडताना कर्णधार म्हणाला, “ही खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही येथे विकेट मिळवू शकतो. कदाचित दव देखील येईल.” यावर कार्तिकने प्रश्न विचारला की या मैदानावर अनेकदा प्रथम फलंदाजी करणारा संघ सामना जिंकतो. आकडेवारी या वस्तुस्थितीची साक्ष देतात. यावर हार्दिकने प्रत्युत्तर दिले की, “खरंच असं आहे का, मला हे माहीत नव्हतं.”
हेही वाचा – IND vs SL 2nd T20: अर्शदीप सिंगने केला नकोसा विक्रम; एकाच सामन्यात टाकले तब्बल ‘इतके’ नो बॉल
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ७५ टक्के सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी २०६ हेच खरे असल्याचे सिद्ध केले.
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने १२ षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद ८५ धावा केल्या आहेत. आता भारताला ४७ चेंडूत १२७ धावांची गरज आहे. सध्या खेळपट्टीवर अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव फलंदाजी करत आहे.