IND vs SL 2nd T20I Match Highlights : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाला विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य दिले. पण भारतीय डावाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली आणि टीम इंडियाला ८ षटकांत ७८ धावांचे लक्ष्य मिळाले. यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य ६.३ षटकात गाठले.
India vs Sri Lanka 2nd T20I Highlights : टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये पहिली मालिका जिंकली आहे.
भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला, श्रीलंकेविरुद्ध 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली
टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला. त्यामुळे षटके कापण्यात आली. भारताला 8 षटकात 78 धावा करायच्या होत्या. यादरम्यान यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. सूर्याने 12 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. हार्दिक पांड्याने नाबाद 22 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला.
टीम इंडियाला तिसरा झटका, यशस्वी बाद
भारताची तिसरी विकेट पडली. यशस्वी 15 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. संघाला विजयासाठी 14 चेंडूत 13 धावांची गरज आहे. हसरंगाने यशस्वीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारताने 5 षटकात 54 धावा केल्या
भारताने 5 षटकात 2 गडी गमावून 54 धावा केल्या आहेत. यशस्वी 24 धावा करून खेळत आहे. हार्दिक पंड्या 3 धावा करून खेळत आहे. टीम इंडिया विजयाच्या जवळ आहे.
भारताला दुसरा धक्का, सूर्या बाद
टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव षटकार ठोकून बाद झाला. 12 चेंडूत 26 धावा करून तो बाद झाला. पाथीरानाने सूर्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
https://twitter.com/EverythingonX/status/1817615640930431237
यशस्वीने शानदार षटकार ठोकला
यशस्वी जैस्वाल तुफानी फलंदाजी करत आहे. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. सूर्यानेही चौकार मारला. भारताने 3 षटकात 1 गडी गमावून 30 धावा केल्या.
टीम इंडियाला पहिला धक्का, संजू आऊट
भारताला पहिला धक्का बसला. सलामीवीर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. तिक्षाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 1.1 षटकात 12 धावा केल्या आहेत.
भारताने पहिल्या षटकात 12 धावा केल्या
पावसानंतर पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे. यशस्वी आणि संजू फलंदाजी करत आहेत. भारताने पहिल्या षटकात 12 धावा केल्या. यशस्वी 6 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्यानंतर खेळत आहे. संजू सॅमसनला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
https://twitter.com/cricketverse_/status/1817609896793194862
पॉवरप्ले दोन षटकांचा असेल
पॉवरप्ले दोन षटकांचा असेल. गोलंदाज जास्तीत जास्त दोनच षटके टाकू शकतो. भारताला 45 चेंडूत 72 धावा करायच्या आहेत.
https://twitter.com/taazakhaba34566/status/1817609748973285824
भारताला विजयासाठी 8 षटकात 78 धावांचे लक्ष्य
पावसामुळे सामना लांबला. त्यामुळे षटके कमी करण्यात आली आहेत. भारताला विजयासाठी 8 षटकात 78 धावा कराव्या लागतील. हा सामना रात्री 10.45 वाजता सुरू होईल.
https://twitter.com/sandeepal2050/status/1817608072887726543
कव्हर काढले जात आहेत. सामन्याच्या सुरुवातीला 45 मिनिटे आणि आता 20 मिनिटे वाया गेली आहेत. त्यामुळे, खेळ पुन्हा सुरू झाल्यावर षटकांमध्ये कपात केली जाऊ शकते.
https://twitter.com/MohdArishA39293/status/1817601076008472967
श्रीलंकेने दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून यशस्वी आणि गिलची जोडी उतरली आहे. यशस्वीने तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत भारताला चांगली सुरूवात करून दिली. पण पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला.
श्रीलंकेने भारतासमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने कुसल परेराच्या 54 धावांच्या झंझावाती खेळीमुळे 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवी बिश्नोईने तीन तर अर्शदीप, अक्षर आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
अक्षर पटेलला मिळाली विकेट
श्रीलंकेची आठवी विकेट पडली. महिष थेक्षाना अवघ्या 2 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला शिकार बनवले. श्रीलंकेने 19.2 षटकांत 8 गडी गमावून 154 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेला 7 वा धक्का, असलंका बाद
श्रीलंकेची 7वी विकेट कर्णधार चारिथ असलंकाच्या रूपाने पडली. तो 14 धावा करून बाद झाला. अर्शदीप सिंगने त्याला शिकार बनवले. संघाने 19 षटकांत 7 गडी गमावून 153 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेने 17 षटकांत 142 धावा केल्या
श्रीलंकेच्या संघाने 17 षटकांत 6 गडी गमावून 142 धावा केल्या. शनाकानंतर वानिंदू हसरंगा शून्यावर बाद झाला. रवी बिश्नोईने या दोघांचीही विकेट घेतली. कर्णधार चारिथ असलंका आणि रमेश मेंडिस फलंदाजी करत आहेत.
श्रीलंकेला चौथा धक्का बसला. कुसल परेरा अर्धशतकानंतर बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने बाद केले. परेराने आपल्या खेळीदरम्यान 34 चेंडू खेळले. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. श्रीलंकेने 16 षटकांत 4 गडी गमावून 139 धावा केल्या.
https://twitter.com/Sbettingmarkets/status/1817584305750897131
कामेंदू मेंडिसला बाद केले.
श्रीलंकेला तिसरा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्याने कामेंदू मेंडिसला बाद केले. कामेंदू यादवने 23 चेंडूत 26 धावा केल्या. आता श्रीलंकेची धावसंख्या 15.1 षटकात 3 बाद 130 धावा आहे. सध्या श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि चरिथ असालंका क्रीजवर आहेत.
कुसल परेराने श्रीलंकेसाठी झळकावले वादळी अर्धशतक
श्रीलंकेची धावसंख्या 14 षटकांनंतर 2 बाद 123 धावा. सध्या कामेंदू मेंडिस आणि अर्धशतकवीर कुसल परेरा क्रीजवर आहेत. दोन्ही फलंदाज सहज धावा काढत आहेत. त्याचवेळी भारतीय संघ तिसऱ्या यशाची वाट पाहत आहे.
श्रीलंकेने 100 धावांचा टप्पा पार केला
श्रीलंकेचे फलंदाज कुसल परेरा आणि कामेंदू मेंडिस यांनी 13व्या षटकात 9 धावा केल्या. आता श्रीलंकेची धावसंख्या 13 षटकांनंतर 2 बाद 108 धावा आहे. कुसल परेरा 29 चेंडूत 45 धावा करून खेळत आहे. तर कामेंदू मेंडिसने 14 चेंडूत 18 धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये 21 चेंडूत 28 धावांची भागीदारी झाली आहे.
https://twitter.com/CricUniverse7/status/1817580644358299897
भारतीय संघाला दुसरे यश मिळाले आहे. रवी बिश्नोईने पथुम निसांकाला बाद केले. पथुम निसांकाने 24 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. आता श्रीलंकेची धावसंख्या 10 षटकांनंतर 2 बाद 80 धावा आहे.
https://twitter.com/Maxviegas0512/status/1817577370741817820
श्रीलंकेची धावसंख्या 7 षटकांनंतर 1 बाद 63 धावा.
भारताकडून रवी बिश्नोईने सातवे षटक टाकले. या षटकात 9 धावा झाल्या. आता श्रीलंकेची धावसंख्या 7 षटकांनंतर 1 बाद 63 धावा आहे. त्याचबरोबर पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांच्यात 26 चेंडूत 44 धावांची भागीदारी आहे.
मोहम्मद सिराजच्या पाचव्या षटकात कुसल परेराने 14 धावा कुटल्या. आता श्रीलंकेची धावसंख्या 5 षटकांनंतर 1 बाद 45 धावा आहे. कुसल मेंडिस 8 चेंडूत 18 धावा करून खेळत आहे. तर, पथुम निशांकने 11 चेंडूत 15 धावा केल्या आहेत.
https://twitter.com/Sardardogarsab/status/1817573069625733165
अर्शदीप सिंगने कुसल मेंडिसला बाद केले
भारतीय संघाला पहिले यश मिळाले आहे. अर्शदीप सिंगने कुसल मेंडिसला बाद केले. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर रवी बिश्नोईने कुसल मेंडिसला झेलबाद केले. कुसल मेंडिसने 11 चेंडूत 10 धावा केल्या. आता श्रीलंकेची धावसंख्या 3.3 षटकांनंतर 1 गडी बाद 26 धावा आहे.
श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली
श्रीलंकेची धावसंख्या 3 षटकांनंतर एकही विकेट न गमावता 21 धावा. भारताकडून मोहम्मद सिराजने तिसरे षटक टाकले. या षटकात दोन्ही सलामीवीरांना 3 धावा करता आल्या.
पहिल्या षटकात 10 धावा झाल्या
श्रीलंकेचा डाव सुरू झाला आहे. श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निशांका आणि कुसल मेंडिस क्रीजवर आहेत. भारताकडून मोहम्मद सिराजने पहिले षटक टाकले. या षटकात दोन्ही सलामीवीरांनी 10 धावा दिल्या.
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत: यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रायन पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महिश तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो.
नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करून प्रवेश केला आहे. शुबमन गिलच्या जागी संजू सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
https://twitter.com/VIJAYANAYAK17/status/1817559218074923384
सामन्याची नाणेफेक सव्वा सातला होणार
पावसामुळे या सामन्यातील नाणेफेक निर्धारित वेळेत होऊ शकली नाही. आता नाणेफेक 7.15 वाजता होईल तर सामना 7.45 वाजता सुरू होईल. खेळाडू सध्या मैदानात आले असून सराव करत आहेत. भारताला टी-२० मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.
https://twitter.com/ajayvaishnav741/status/1817554671713542513
पावसामुळे खेळपट्टी ओली झाली आहे. त्यामुळे खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वेळ लागत असल्याने भारत विरुद्ध श्रीलंका संघाच्या दुसऱ्या टी-२० सामन्याच्या नाणेफेकील विलंब होत आहे.
श्रीलंकेचा संघ:
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महेश तिक्षिना, मातिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, अविष्का फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, दिनेश चंडिमल, दुनिथ वेलगे, चामिंडू विक्रमसिंघे