श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० राहुल त्रिपाठीला आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. राहुल त्रिपाठीला जूनमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाच्या संघात स्थान मिळाले होत, पण या खेळाडूला पदार्पणाची संधी मिळत नव्हती. अखेर ६ महिन्यांनंतर राहुल त्रिपाठीची प्रतीक्षा संपली आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर, जे या खेळाडूचे होम ग्राउंड देखील आहे, राहुल त्रिपाठीला फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्या हस्ते पदार्पण कॅप देण्यात आली.

आयपीएल २०१७ मध्ये राहुल त्रिपाठीचे नाव पहिल्यांदा झळकले होते. त्यावेळी राहुल त्रिपाठीने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंटकडून पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्रिपाठी अपयशी ठरला, पण येत्या हंगामात हा खेळाडू चमकू लागला. राहुल त्रिपाठीने २०२२ मध्ये आपल्या प्रतिभेची खरी ताकद दाखवून दिली. त्या कामगिरीच्या जोरावर या फलंदाजाने टीम इंडियात स्थान मिळवले. त्याला जखमी खेळाडू संजू सॅमसनच्या जागी संधी मिळाली.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

आयपीएल २०२२ मध्ये चमकला राहुल त्रिपाठी –

सनरायझर्स हैदराबादने राहुल त्रिपाठीला आपल्या संघात संधी दिली. त्यानंतर या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली. त्रिपाठीने संपूर्ण हंगामात २० षटकारांच्या मदतीने ४१३ धावा केल्या. त्रिपाठीची सरासरी ३७.५५ होती आणि त्याचा स्ट्राईक रेटही १६० च्या आसपास होता. हे स्पष्ट आहे की त्रिपाठीच्या या कामगिरीने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना प्रभावित केले. त्यामुळे आज हा खेळाडू टीम इंडियाचा एक भाग आहे.

त्रिपाठी वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो –

राहुल त्रिपाठी हा त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. या खेळाडूने स्थानिक क्लब सामन्यात ६ चेंडूत ६ षटकारही लगावले आहेत. त्रिपाठीचा अलीकडचा फॉर्मही अप्रतिम आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग तीन शतके झळकावली होती.

कोण आहे राहुल त्रिपाठी?

राहुल त्रिपाठी यांचा जन्म रांची (झारखंड) येथे झाला. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. ३१ वर्षीय फलंदाज २०१० पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा – MAH vs ASM: रणजी ट्रॉफीमध्ये केदार जाधवचा धुमाकूळ; आसामच्या गोलंदाजांना घाम फोडत झळकावले द्विशतक

राहुल त्रिपाठीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५२ सामन्यांत २७२८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ५३ लिस्ट-ए सामन्यात १७८२ धावा केल्या. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये १२५ सामने खेळताना त्याने २८०१ धावा केल्या आहेत.

भारत आणि श्रीलंका संघांतील दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे, तर श्रीलंका संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आहे. श्रीलंका संघाने ८.२ षटकानंतर बिनबाद ८० धावा केल्या आहेत. युझवेंद्र चहलने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने कुसल मेंडिसला ५२ धावांवर बाद केले.