भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिकेतील दुसरा टी२० सामना गुरूवारी (५ जानेवारी) खेळला जाणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मैदानावर २०१२ पासून केवळ तीनच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले गेले. त्यातील दोन सामने भारताने जिंकले आहेत. भारताने या मैदानावर शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्धच खेळला होता. तेव्हा विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारताने ७८ धावांनी विजय मिळवला होता. तर याआधी झालेल्या सामन्यात मात्र श्रीलंकेने बाजी मारली होती. यामुळे आता होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ चांगलीच टक्कर देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात २ धावांनी विजय मिळवला. भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल टीम इंडियासाठी महागडा ठरला. त्याने २ षटकात २६ धावा लुटल्या. यानंतर चहलच्या जागी भारतीय संघ व्यवस्थापन विचार करणार आहे. त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर यांची निवड होऊ शकते. मात्र, भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने सुंदरच्या समावेशाची कल्पना फेटाळून लावली आहे. चहलला दुसऱ्या टी२० मधून वगळू नये, असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा: Shoaib Akhtar: “मेरा रिकॉर्ड तोड़ते-तोड़ते कहीं हड्डियां ना तुड़वा लें…” उमरानचा वेग पाहून रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरला आले टेन्शन

युजवेंद्र चहलला वगळण्याचा विचार करणेही खूप लवकर: वसीम जाफर

वसीम जाफरने ESPNcricinfo च्या हवाल्याने सांगितले. “वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून युजवेंद्र चहलला आणणे हा खूप मोठा आणि कठीण निर्णय असेल कारण मला वाटते की प्लेइंग इलेव्हनमध्ये मनगट स्पिनर असणे खूप महत्वाचे आहे. जरी सुंदरने आपल्या फलंदाजी आणि पॉवरप्ले गोलंदाजीसह टीम इंडियाला चांगले संतुलन प्रदान केले असले तरी, मला वाटत नाही की चहलसारखा गोलंदाज, ज्याने संघासाठी इतकी चांगली कामगिरी केली आहे, तो एका खराब आऊटिंगनंतर बाद होईल. चहलला वगळण्याचा विचार करणेही घाईचे आहे असे मला वाटते.”

वसीम जाफरने शेवटी सांगितले की जर स्टार वेगवान गोलंदाज आजारातून बरा झाला असेल तर अर्शदीप सिंग श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षल पटेलची जागा घेऊ शकतो. याशिवाय हार्दिक पांड्या आणि संघ व्यवस्थापन आणखी काही बदल करतील असे त्याला वाटत नाही.

हेही वाचा: ICC T20I Ranking: आयसीसी क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप, तर दिपक हुडा पुन्हा टॉप १०० मध्ये दाखल

जाफर म्हणाला की जर अर्शदीप पुढील टी२० साठी उपलब्ध असेल तर मला वाटते की तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येईल. कदाचित त्याला हर्षल पटेलच्या जागी संधी मिळेल. हर्षल पटेलसाठी पहिला टी२० चांगला नव्हता. पण याशिवाय मला प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल दिसत नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 2nd t20 will chahal lose place in playing xi for sundar amazing advice from wasim jaffer avw