कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२० वर्षात आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. इंदूरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने लंकेवर ७ गडी राखून मात केली. या विजयासह मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे, पहिला सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे वाया गेला होता. भारताकडून लोकेश राहुलने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने चांगली साथ दिली.
अवश्य वाचा – IND vs SL : अवघी एक धाव आणि रोहितला मागे टाकत विराट ठरला अव्वल
विराटने वर्षाच्या सुरुवातीलाच धडाकेबाज सुरुवात करत अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. एक धाव काढत विराटने रोहित शर्माला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज हा बहुमान मिळवला. याचसोबत कर्णधार या नात्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराटने १ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. ३० डावांमध्ये ही कामगिरी पूर्ण करताना विराटने फाफ डु प्लेसिस आणि केन विल्यमसन यांना मागे टाकलं.
Fastest to 1000 runs In T20I as Captain
Virat Kohli – 30 Inngs*
Faf Du Plessis – 31 Inngs
Kane Williamson – 36 Inngs#INDvsSL— CricBeat (@Cric_beat) January 7, 2020
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने शिखर धवनही माघारी परतला. मात्र यानंत कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी ६ धावांची गरज असताना श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अवश्य वाचा – Ind vs SL 2nd T20I : नवीन वर्षाची सुरुवात विजयाने, ७ गडी राखून भारत विजयी