भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात तिसरा वनडे सामना त्रिवेंद्रममध्ये खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्टारसाठी ग्रीनफिल्ड स्टेडियमच्या बाहेर ५० फूट मोठा कटआउट लावला आहे. ज्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेंद्रसिंग धोनीचा ५० फूट मोठा कटआउट –

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनी ५० फूट मोठा कटआउट लावला आहे. चाहत्यांनी हा कटआउट तिसऱ्या सामन्यापूर्वी तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर लावला आहे. ज्यामध्ये धोनी भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या एक हातात बॅट आहे. धोनीच्या या कटआउटचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतातील धोनीचा हा सर्वात मोठा कटआउट असल्याचे म्हटले जात आहे.

धोनीशिवाय विराट, रोहित आणि संजूचे कटआउट्सही लावलेत –

महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त विराट कोहली, रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज संजू सॅमसन यांचेही कटआउट लावले आहेत. हे सर्व कटआउट्स ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर लावण्यात आले आहेत. भारतीय संघातील या स्टार खेळाडूंचे मोठे कटआउट्स चाहत्यांना खूप आवडत आहेत. हे स्टेडियमजवळील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे.

हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: कुलदीप यादवच्या रडारवर सचिन तेंडुलकरचा विक्रम; दोन बळी घेताच करणार ‘हा’ कारनामा

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार भारतीय संघाने १५ षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद ९५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहित शर्मा ४२ आणि शुबमन गिल ४५ धावांवर नाबाद आहे.