India vs Sri Lanka 3rd ODI Match: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी (१५ जानेवारी) खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. त्यामुळे यजमान संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० असा अजिंक्य आघाडीवर आहे. तिसरा सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला जात असून या सामन्यासाठीची नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकली आहे. दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल झाले आहेत. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलने धडाकेबाज शतक झळकावत संघातील आपली दावेदारी पक्की केली आहे.

शुबमन गिलने उत्कृष्ट खेळी खेळत ८९ चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याचे हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आहे. याआधी शुभमनने झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर शतक झळकावले होते. त्याचवेळी कोहलीने ४८ चेंडूत वनडे कारकिर्दीतील ६५वे अर्धशतकही पूर्ण केले. आतापर्यंत दोघांमध्ये ११०+ धावांची भागीदारी झाली आहे. ३३ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर २२४ आहे. कर्णधार रोहित शर्मा ४२ धावा करून बाद झाला. गिल ९७ चेंडूत ११६ धावा करून त्रिफळाचीत झाला. त्याला राजिथाने बाद केले.

रोहितचा साथीला आलेला शुबमन गिलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत एकदिवसीय मधील दुसरे शतक ठोकले. यामुळे आता द्विशतकवीर इशान किशनचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. तो अजूनही खेळपट्टीवर टिकून असून विराट आणि त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अक्षरशः घामटा काढला. त्याने आणि रोहितने भारतीय डावाच्या ६व्या षटकात फिरकीपटू लाहिरू कुमाराला अक्षरशः कुटला असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. रोहितने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्याने एक धाव काढून शुबमनला फटके मारण्याची संधी दिली. त्याने देखील हे आमंत्रण स्विकारत लागोपाठ ४,४,४,४ असे ऑफसाइडला चौकार मारले. त्या षटकात भारताने २३ धावा कुटल्या. तसेच त्याचे अर्धशतक देखील पूर्ण केले असून त्याचे हे ६वे आहे.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: ६,१,४,४,४,४ लाहिरू कुमाराच्या एका षटकात सलामीवीरांनी चौकार-षटकारांची केली आतिषबाजी

एका बाजूला किंग कोहली देखील अर्धशतक करून त्याला वेळोवेळी पुढे जाऊन मदत करत आहेत. दोघांमध्ये चांगले ताळमेळ दिसून आला. त्यांच्यात १३१ धावांची भागीदारी झाली. टीम इंडिया या सामन्यात मोठ्या धावसंख्येकडे जाताना दिसत असून अजूनही श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव ज्याला आजच्या सामन्यात संधी मिळाली आहे ते यायचे बाकी आहे. एका बाजूला विराट कोहली त्याचा फॉर्म कायम राखत ४६वे शतक झळकावणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे आहे. सध्या तो ७१ धावांवर खेळत असून भारतीय डावाची १६ षटके बाकी आहेत. भारत ३५० चा आकडा गाठू शकते. वॉशिंग्टन सुंदरपर्यंत आजच्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी असल्याने श्रीलंकेला अधिक विकेट्सची गरज आहे.

Story img Loader