IND vs SL 3rd ODI Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील अंतिम आणि तिसरा सामना आज तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. तिसऱ्या वनडे सामन्याला दुपारी १:३० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी खेळाडू वसीम जाफरने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. वसीम जाफरने ही भविष्यवाणी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीने मालिकेच्या सुरुवातीच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. त्याने या सामन्यात आणि एकदिवसीय कारकिर्दीतील ४५ वे शतक झळकावले होते. मात्र, ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट शांत राहिली. ज्यामुळे त्याला केवळ ४ धावाच करता आल्या.

माजी खेळाडू वसीम जाफरला मात्र असे वाटते की, जर तिसऱ्या सामन्यात कोहलीने चांगली सुरुवात केली, तर त्याला थांबवता येणार नाही. त्याचबरोबर तो एकदिवसीय कारकिर्दीतील ४६वे शतक झळकावू शकतो.

माजी खेळाडू वसीम जाफर ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना म्हणाला, ”विराट कोहलीने ३० धावांचा टप्पा ओलांडला तर तो आणखी एक वनडे शतक झळकावेल. तो अशा प्रकारचा खेळाडू नाही, जो ४०-५० पर्यंत पोहोचतो आणि नंतर त्याची विकेट फेकतो. त्यामुळे चांगली सुरुवात आणि शतकाची आशा आहे.”

हेही वाचा – IND vs SA: शफाली वर्माची वादळी खेळी; एकाच षटकात पाडला धावांचा पाऊस, पाहा VIDEO

विराट कोहली खूप काळ शतक झळकावू शकला नव्हता. पण आता तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच तो जबरदस्त फटकेबाजी करत आहे. अशा स्थितीत चाहत्यांना शेवटच्या वनडेतही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

भारत शेवटची वनडे जिंकेल – वसीम जाफर

तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यातही वसीम जाफरने भारताच्या विजयाबद्दल बोलला आहे. जाफरच्या मते, श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याची ताकद भारताकडे आहे. तो म्हणाला, ”मला वाटते की भारत ३-० ने जिंकेल. कारण त्यांच्याकडे खूप मजबूत संघ आहे. शेवटची वनडे हरली तर मला आश्चर्य वाटेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 3rd odi former player wasim jaffer has made a big prediction about virat kohli vbm