India vs Sri Lanka 3rd ODI Match Today, 15 January 2023: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी (१५ जानेवारी) खेळला गेला. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने आधीच विजय मिळवला. त्यामुळे यजमान संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० असा अजिंक्य आघाडीवर असताना आजच्या सामन्यात देखील टीम इंडियाने बाजी मारत श्रीलंकेचा तब्बल ३१७ धावांनी धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. या मालिकेतील दुसरे शतक नोंदविणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताने ठेवलेल्या ३९० धावांच्या डोंगराएवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अवघ्या ३७ धावात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला. नुवानिदू फर्नांडो, कसून रजिथा आणि कर्णधार दासुन शनाका या दोघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. फर्नांडोने सर्वाधिक १९ धावा केल्या. अखेर श्रीलंकेचा डाव केवळ ७३ धावात आटोपला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ गडी बाद करत त्याला साथ दिली.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा साथीदार शुबमन गिलने तो सार्थ ठरवत शानदार शतक झळकावले. दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल करण्यात आले होते. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलने धडाकेबाज शतक झळकावत संघातील आपली दावेदारी पक्की केली आहे. यामुळे द्विशतकवीर इशान किशनचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे आज ग्रीन फिल्ड तिरुअनंतपुरममध्ये वादळ पाहायला मिळाले. विराटने तर त्याचे दीडशतक त्याने साजरे केले. तर शुबमन गिलने देखील त्याचे कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३९० धावांचा मोठा डोंगर उभारला आणि त्याजोरावारच टीम इंडियाने श्रीलंकेला व्हाईटवॉश देत अक्षरशः त्यांचे मानसिकरित्या देखील खूप मोठा पराभव केला आहे. शुबमन गिलने उत्कृष्ट खेळी खेळत ८९ चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याचे हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आहे. याआधी शुबमनने झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर शतक झळकावले होते.
विराट आणि शुबमनने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अक्षरशः घामटा काढला. दोघांमध्ये चांगला ताळमेळ दिसून आला. त्यांच्यात १३१ धावांची भागीदारी झाली. त्याने आणि रोहितने भारतीय डावाच्या ६व्या षटकात फिरकीपटू लाहिरू कुमाराला अक्षरशः कुटला असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. एकदिवसीय मालिकेतील विराटचे हे दुसरे शतक असून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४ वे शतक ठरले. त्याने ११० चेंडूत नाबाद १६६ धावा केल्या त्यात त्याने सर्वाधिक ८ षटकार आणि १३ चौकार मारले. श्रेयस अय्यरने ३८ (३२), केएल राहुल ७ (६), सूर्यकुमार यादव ४(४) यांना काही फार मोठी धावसंख्या करता आली नाही. तर अक्षर पटेल २ धावा करून नाबाद राहिला. श्रीलंकेकडून कसून राजिथाने आणि लाहिरू कुमाराने यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर चामिका करुणारत्नेला १ गडी बाद करण्यात यश आले.
भारताने उभारलेल्या डोंगरापुढे श्रीलंकेचे फलंदाज फार काळ तग धरू न शकल्याने टीम इंडियाचा ३-० असा मालिका विजय साकारला गेला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय आहे. लंकेचे दहन असेच या मालिकेतील भारताच्या कामगिरीचे वर्णन करता येईल. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय भारत – ३१७ वि. श्रीलंका, २०२३ न्यूझीलंड – २९० वि. आयर्लंड, २००८ ऑस्ट्रेलिया – २७५ वि. अफगाणिस्तान, २०१५ दक्षिण आफ्रिका – २७२ वि. झिम्बाब्वे, २०१० दक्षिण आफ्रिका – २५८ वि. श्रीलंका, २०१२