Shreyas Iyer Bowling: भारतीय संघ अशा खेळाडूच्या शोधात आहे, जो मधल्या फळीत फलंदाजीसोबत काही गोलंदाजी करू शकेल. भारतीय संघासाठी हे काम श्रेयस अय्यर करू शकतो. याची झलक भारत-श्रीलंका तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाली. खरं तर, तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये कर्णधार रोहित शर्माने श्रेयस अय्यरला एक षटक टाकायला लावले आणि तिथेच अय्यरने सर्वांना चकित केले. त्यांच्या गोलंदाजीच्या चर्चांवर वृतपत्रे आणि बातम्यांमध्ये मथळे तयार झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिरुअनंतपुरम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ३१७ धावांनी विजय मिळवत श्रीलंकेच्या संघाचा पराभव केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या फरकाच्या बाबतीत हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. भारताच्या विजयाचा हिरो म्हणून विराट कोहली समोर आला. माजी कर्णधाराने ११० चेंडूत १६६ धावांचे योगदान दिले. शतक झळकावल्यानंतर विराट आणखीनच जीवघेणा झाला. १०० ते १६६ धावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने अवघ्या २५ चेंडूंचा सामना केला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही श्रेयस अय्यरला गोलंदाजी केली.

अय्यरच्या गोलंदाजीवर विराट कोहली झाला हैराण

श्रेयस अय्यरने त्याच्या षटकात केवळ दोन धावा दिल्या. खुद्द विराट कोहलीही अय्यरच्या कसून गोलंदाजीने हैराण झाला होता. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विराट अय्यरच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये उभा आहे. त्याच्या चतुराईने केलेल्या गोलंदाजीमुळे फलंदाज बचावला. स्पिलमध्ये उभ्या असलेल्या विराट अय्यरची ही तगडी गोलंदाजी पाहून तो अवाक् झाला. कोहलीची ही प्रतिक्रिया चाहत्यांनाही खूप आवडली आहे.

या सामन्यात विराट कोहली व्यतिरिक्त शुबमन गिलनेही शतक झळकावले. त्याने ९७ चेंडूत ११६ धावा केल्या. गिलने कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. भारताने श्रीलंकेला विजयासाठी ३९१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन संघ ७३ धावांत सर्वबाद झाला.

हेही वाचा: Shubman Gill: नक्की कोणती ‘सारा’? शतकवीर गिल क्षेत्ररक्षणसाठी येताच चाहत्यांनी केली चिडवायला सुरुवात, video व्हायरल

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अय्यरची आकडेवारी

श्रेयस अय्यरने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि लिस्ट ए करिअरमध्ये गोलंदाजी केली आहे. श्रेयसच्या नावावर फर्स्ट क्लासमध्ये ४ आणि लिस्ट ए मध्ये ५ विकेट्स आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात रोहित शर्मा श्रेयसचा बॅकअप गोलंदाज म्हणून वापर करू शकतो हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, श्रेयसने फलंदाजी केली तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ३२ चेंडूत ३८ धावा केल्या.