India vs Sri Lanka 3rd ODI Match Today, 15 January 2023: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने रविवारी कारकिर्दीतील ४६ वे शतक झळकावले. कोहलीने ८५ चेंडूत हे स्थान गाठले. वेगवान फलंदाजी करताना विराट कोहलीने सामन्याच्या चारही कोपऱ्यांवर फटके मारले. मात्र यादरम्यान सामन्यात मोठी दुर्घटना घडली. क्षेत्ररक्षण करताना श्रीलंकेचे दोन खेळाडू सीमारेषेवर एकमेकांवर आदळल्याने जखमी झाले. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. ही घटना घडली तेव्हा विराट कोहली ९५ धावांवर फलंदाजी करत होता. भारताची धावसंख्या ३०२ अशी होती.
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलने शतकी खेळी केली. तर गिलपाठोपाठ किंग कोहलीनेही तुफानी शतकी खेळी केली. मात्र विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याने मारलेला एक फटका श्रीलंकेच्या दोन क्षेत्ररक्षकांना जायबंदी करून गेला. कोहलीने स्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका अडवताना बंदारा आणि वँदेरेसे या श्रीलंकेच्या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जोरदार टक्कर झाली. त्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. तसेच दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले.
कोहलीने एक शॉट खेळला आणि चेंडू सीमारेषेकडे जाऊ लागला, तेव्हा विरुद्ध दिशेने येणारे दोन श्रीलंकेचे खेळाडू एकमेकांवर आदळले आणि जखमी झाले. चेंडू सीमापार गेला आणि कोहलीने ९९ धावांपर्यंत मजल मारली. षटकातील पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावला. वेगाने सीमारेषेकडे सुटलेला हा चेंडू रोखण्यासाठी श्रीलंकेचे बंडारा आणि वँदेरेसे हे दोन क्षेत्ररक्षक धावत आले. मात्र चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात त्यांच्यात भीषण टक्कर झाली. तसेच हे दोन्ही क्षेत्ररक्षक गंभीररीत्या जायबंदी झाले. त्यानंतर मेडिकल स्टाफने मैदानात धाव घेतली. दोन्ही खेळाडू मैदानावरच वेदनेने रडताना दिसले. यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, चेंडू सीमापार गेल्याने विराट कोहलीला चार धावा मिळाल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एकेरी धाव घेत विराटने आपलं शतक पूर्ण केलं.
या शतकासह कोहली महान सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. यावर्षी तो आपला विक्रम मागे टाकेल अशी आशा चाहत्यांना आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची वनडेत ४९ शतके आहेत. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६३ सामने खेळले असून एकूण १८४२६ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत ४९ शतके आणि ९६ अर्धशतके केली आहेत. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके आहेत जो एक विश्वविक्रम आहे. पण विराट कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याने सचिनला मागे टाकले. सूर्यकुमार यादव ४ धावा करून बाद झाला तर केएल राहुलही स्वस्तात तंबूत परतला.