भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज तिरुवनंतपुरम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतली आहे. या सामन्यात मागील सामन्याचा हिरो ठरलेल्या कुलदीप यादवकडे सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. कोलकाता एकदिवसीय सामन्यात युझवेंद्र चहलला दुखापत झाल्याने त्याच्या जागी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला होता. या सामन्यात कुलदीपने तीन विकेट घेत पाहुण्यांचे कंबरडे मोडले, या अप्रतिम कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
कुलदीप सचिनचा विक्रम मोडण्याच्या तयारीत –
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन बळी घेत कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा २३वा खेळाडू ठरला. आजच्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्यास, तो भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. मास्टर ब्लास्टरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – IND vs SL ODI Series: तिसऱ्या सामन्यापूर्वी वसीम जाफरची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘जर विराट कोहलीने…’
भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अनिल कुंबळे पहिल्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर ९५३ विकेट्सची नोंद आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आणि क्रमांकावर हरभजन सिंग (७०७) आणि कपिल देव (६८७) आहेत.
हेही वाचा – IND vs SA: शफाली वर्माची वादळी खेळी; एकाच षटकात पाडला धावांचा पाऊस, पाहा VIDEO
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अशेन बंदारा, चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, जेफ्री वेंडरसे, चमिका करुणारत्ने, कसून राजिथा, लाहिरू कुमारा