भारत आणि श्रीलंका संघात मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहली आपल्या वनडे कारकिर्दीतील ४६ वे शतक झळकावले. त्याचबरोबर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीने ८५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या या खेळीत १० चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ७३वे शतक आहे. विराटने कसोटीत क्रिकेटमध्ये २७ शतके झळकावली आहेत, तर टी-२० क्रिकेटमध्ये एक शतक केले आहे.

भारतीय संघाने ४५ षटकांच्या समाप्तीनंतर २ बाद ३३२ धावा केल्या. विराट कोहली १२६ आणि श्रेयस अय्यर ३७ धावांवर नाबाद आहेत.

या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांचा भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ४२ धावांवर बाद झाला. त्याने ४९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यानंतर शुबमन गिलने आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर तो देखील ११६ धावांवर बाद झाला. त्याने ९७ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकार लगावले.