विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी खेळी खेळली, त्याने ११० चेंडूत नाबाद १६६ धावा केल्या. कोहलीने या दीड शतकाच्या जोरावर अनेक विक्रम केले. ज्यामध्ये त्याने अनेक दिग्गजांना मागे सोडले. विराट कोहलीने धावांबरोबरच षटकारांचा विक्रम केला. ज्यामध्ये त्याने ब्रायन लारा, किरॉन पोलार्ड, शेन वॉटसन या खेळाडूंना मागे टाकत वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ज्यामध्ये भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद १६६ धावा केल्या. तसेच शुबमने गिलने देखील ११६ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माने देखील ४२ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे भारतीय संघाने ५ बाद ३९० धावा केल्या आणि श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले.
कोहलीने त्याच्या दीड शतकासह सचिनला मागे टाकले, हे त्याचे घरच्या मैदानावरील २१ वे एकदिवसीय शतक आहे, जे भारतातील सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम आहे. पहिल्या सामन्यातील शतकासह कोहलीने २० शतकांसह सचिनच्या बरोबरी साधली. शतक झळकावल्यानंतर कोहलीने आपले गीअर्स बदलले, त्यानंतर त्याने षटकारांचा पाऊसही पाडला. कोहलीने या डावात एकूण ८ षटकार लगावले.
विराट कोहलीने नाबाद १६६ धावांच्या आपल्या खेळीसाठी ११० चेंडूचा सामना केला. या खेळीत १३ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.
याआधी, कोहलीने एकदिवसीय डावात कधीही ८ षटकार लगावले नव्हते, म्हणजेच एका डावात तो कोहलीचे सर्वाधिक षटकार आहेत. कोहलीने त्याचबरोबर शेन वॉटसन, लारा यांसारख्या दिग्गजांना एकदिवसीय सामन्यांच्या सर्वाधिक षटकांराच्या बाबतीत मागे सोडले आहे.
हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्सचा टाकले मागे; वनडे क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम
कोहलीने वनडेत १३६ षटकार पूर्ण केले –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत १३६ षटकार लगावले आहेत. षटकारांच्या बाबतीत, कोहलीने माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली. सेहवागने देखील १३६ षटकार लगावले आहेत. या प्रकरणातील दोघेही संयुक्तपणे सहावे भारतीय फलंदाज आहेत. या ८ षटकारांसह कोहलीने खालील चार फलंदाजांना मागे टाकले आणि सेहवागच्या बरोबरी साधली.
हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा फलंदाज
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज –
वीरेंद्र सेहवाग: १३६
विराट कोहली एकदिवसीय षटकार: १३६*
किरॉन पोलार्ड: १३५
ब्रायन लारा: १३३
शेन वॉटसन: १३१
अॅरॉन फिंच: १२९