India vs Sri Lanka 3rd ODI Match: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी (१५ जानेवारी) खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. त्यामुळे यजमान संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० असा अजिंक्य आघाडीवर असताना आजच्या सामन्यात देखील टीम इंडिया विजयी होईल अशी परिस्थितीत आहे. कारण भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे आज ग्रीन फिल्ड तिरुअनंतपुरममध्ये वादळ पाहायला मिळाले. विराटने तर त्याचे दीडशतक त्याने साजरे केले. तर शुबमन गिलने देखील त्याचे कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३९० धावांचा मोठा डोंगर उभारला असून व्हाईटवॉश टाळण्यासाठी लंकेला विजयासाठी ३९१ धावांची गरज आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा साथीदार शुबमन गिलने तो सार्थ ठरवत शानदार शतक झळकावले. दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल करण्यात आले होते. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलने धडाकेबाज शतक झळकावत संघातील आपली दावेदारी पक्की केली आहे. यामुळे द्विशतकवीर इशान किशनचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. भारताचे दोन्ही सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शानदार फलंदाजी करत भारताला ९५ धावांची सलामी भागीदारी करून मजबूत पाया रचून दिला. रोहित आठ धावांनी त्याचे अर्धशतक करण्यापासून चुकला आणि त्याला करुणारत्नेने बाद आविष्का फर्नाडोकरवी झेलबाद केले. त्याने ४९ चेंडूत ४२ धावा केल्या. त्यात लाहिरूच्या षटकातील एका षटकाराचा समावेश आहे.
शुबमन गिलने उत्कृष्ट खेळी खेळत ८९ चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याचे हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आहे. याआधी शुभमनने झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर शतक झळकावले होते. त्याचवेळी कोहलीने ४८ चेंडूत वनडे कारकिर्दीतील ६५वे अर्धशतकही पूर्ण केले. ३३ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर २२४ आहे. कर्णधार रोहित शर्मा ४२ धावा करून बाद झाला. गिल ९७ चेंडूत ११६ धावा करून त्रिफळाचीत झाला. त्याला राजिथाने बाद केले.
विराट आणि शुबमनने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अक्षरशः घामटा काढला. दोघांमध्ये चांगले ताळमेळ दिसून आला. त्यांच्यात १३१ धावांची भागीदारी झाली. त्याने आणि रोहितने भारतीय डावाच्या ६व्या षटकात फिरकीपटू लाहिरू कुमाराला अक्षरशः कुटला असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. वनडे मालिकेतील विराटचे हे दुसरे शतक असून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४ वे शतक ठरले. त्याने ११० चेंडूत नाबाद १६६ धावा केल्या त्यात त्याने सर्वाधिक ८ षटकार आणि १३ चौकार मारले.
श्रेयस अय्यरने ३८ (३२), केएल राहुल ७ (६), सूर्यकुमार यादव ४(४) यांना काही फार मोठी धावसंख्या करता आली नाही. तर अक्षर पटेल २ धावा करून नाबाद राहिला. श्रीलंकेकडून कसून राजिथाने आणि लाहिरू कुमाराने यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर चामिका करुणारत्नेला १ गडी बाद करण्यात यश आले.