India vs Sri Lanka 3rd T20 Score Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना शनिवारी, ७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या टी२० मध्ये टीम इंडियाने २ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली होती, तर पुण्यातील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने पुनरागमन करत १६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती. आता निर्णायक सामना राजकोटमध्ये होणार आहे. येथे टीम इंडियाला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसरी मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर श्रीलंकेची नजर भारतात प्रथमच टी२० मालिका जिंकण्यावर असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात अर्शदीप सिंग याच्या वाईट कामगिरीमुळे त्याला तिसऱ्या सामन्यात खेळायला मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग याने दुसऱ्या टी२० मध्ये २ षटकात तब्बल ५ नो-बॉल टाकले होते. त्याने पहिल्या षटकातच नो-बॉलची हॅटट्रिक पूर्ण केली होती. या सामन्यात त्याने ३७ धावा खर्च केल्या. यामुळे त्याला संपूर्ण ४ षटके टाकता आली नाही. अशात त्याला तिसऱ्या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये जागा मिळण्याच्या संधी फारच कमी आहेत.

आता जर आपण या निर्णायक सामन्यासाठी ड्रीम११ संघाबद्दल बोललो, तर आपण सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल आणि श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका यांना विसरू शकत नाही, ज्यांनी गेल्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७९ आणि दुसऱ्या डावात १४९ अशी आहे. फिरकीपटूंना येथे अनेकदा मदत मिळते. वेगवान गोलंदाज संथ चेंडूंचा फायदा घेताना दिसतात. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही दव प्रभावी ठरू शकतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तुमची ड्रीम११ टीम निवडावी लागेल.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यानुसार राजकोटच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये कमी बदल होतील, कारण दुसऱ्या टी२० मध्ये एकही खेळाडू जखमी झाला नाही. यामुळे भारतीय संघात फार बदल होणार नाहीत. तरीही अर्शदीपला नाही घेतले तर कोण त्याची जागा घेणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण पहिल्या सामन्यात हर्षल पटेल याचीही चांगलीच धुलाई केली होती. त्याने ४ षटकात ४१ धावा देत २ बळी घेतले होते.

यामुळे हर्षललाही तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता नाही. भारताकडे मुकेश कुमार हा मध्यमगती गोलंदाज आहे. त्याला अनेक संघात निवडले गेले, मात्र अंतिम अकरामध्ये स्थान न मिळाल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण लांबले आहे. यामुळे उजव्या हाताच्या या गोलंदाजांला हार्दिक संधी देणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

हेही वाचा: जेव्हा धोती कुर्ता घातलेले खेळाडू चौकार-षटकार मारतात अन् कॉमेंट्री संस्कृतमध्ये होते… या अनोख्या स्पर्धेचा Video व्हायरल

हवामान आणि खेळपट्टी

राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या २०२ धावांची आहे. दुसरीकडे, सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे तर, ती ८७ धावांची होती, जी दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. येथे धावांची सरासरी १६४ आहे, अशा स्थितीत फलंदाजांवर विश्वास व्यक्त केला जाऊ शकतो. हवामान राजकोटमध्ये नेहमी कोरडे असते. सध्या हिवाळा सुरु असल्याने रात्रीच्या सामन्यात दवाचा परिणाम अधिक होतो. मात्र पहिल्या दोन्ही सामन्यात ज्यांनी पहिले फलंदाजी केली आहे तेच विजयी झाले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दोन्ही कर्णधार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असेल.

सामना कधी, कुठे, किती वाजता

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राजकोट, संध्याकाळी ७.०० वाजता, स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार

भारतीय संघ

इशान किशन, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, राहुल त्रिपाठी, मुकेश कुमार, शुबमन गिल, शिवम मावी

श्रीलंका संघ

पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, दिलशान मदुशंका, लाहिरू कुमारा, अविष्का बंदर फर्नांडो, अशेंदुस फर्नांडो, दुय्यम फर्नांडो वेललागे, नुवान तुषारा, कसून रजिथा, सदीरा समरविक्रमा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 3rd t20 arshdeep singh address cut in rajkot know who will get a chance in team india avw