भारत आणि श्रीलंका संघातील तिसऱ्या टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाला २२९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तात १६.४ षटकांत श्रीलंकेचा संघ १३७ धावांवर आटोपला. ज्यामुळे भारतीय संघाने ९१ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ नावावर केली .या दरम्यान सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार जमिनीवर झोपून एक खणखणीत षटकार शॉट लगावला आहे.
इशान किशन बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने शानदार फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवनेच आपल्या दमदार खेळीने सर्वांचे लक्ष्य खेचून घेतले. ज्यामध्ये त्याने अनेक आकर्षक शॉट्स लगावले. सूर्यकुमारने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याला जमिनीवर झोपून अप्रतिम शाॉट खेळला, जो पाहून प्रेक्षकॉही अवाक झाले.
हा शाॉट मारण्यापूर्वी सूर्यकुमार स्टंपच्या पुढे वाईड लाईनकडे गेला, पण गोलंदाजाने चेंडू फुलटॉस टाकून फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु सूर्याने जमिनीवर झुकत अजूनही चेंडूशी चांगला संपर्क साधताना, आकर्षक शॉट लगावला. तसेच भारताने २०० धावांचा आकडा पार केला. त्याचबरोबर सूर्याने फक्त ४५ चेंडूत तिसरे टी-२० शतक पूर्ण केले.
भारतासाठी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या –
सूर्यकुमार यादवची टी-२० इंटरनॅशनलमध्ये ११२ धावांची धावसंख्या ही भारतासाठी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीतील विशेष बाब म्हणजे तिसरा आणि पाचवा सर्वोत्तम धावसंख्या त्याचीच आहे. त्याने २०२२ मध्ये नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध ११७ धावांची खेळी केली होती, तर न्यूझीलंडविरुद्ध १११ धावांची खेळी केली होती. या प्रकरणात विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. ज्याने आशिया कप २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते.