भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना रोमांचक झाला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने भारताचा पराभव करत मालिकेत बरोबरी साधली. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव करत मोहिमेला सुरुवात केली होती. आता या दोन्ही संघांतील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणारा निर्णायक सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारताला घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धची पाचवी मालिका जिंकायची आहे.
राजकोटमध्ये भारताची कामगिरी –
राजकोटच्या मैदानावर भारतीय संघ गेली ६ वर्षे अजिंक्य आहे. येथे झालेल्या एकूण ४ सामन्यांपैकी भारताला तीन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. २०१७ मध्ये न्यूझीलंडने भारताचा ४० धावांनी पराभव केला होता. या मैदानावर शनिवारी (७ जानेवारी) भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना होणार आहे. येथे दोन्ही संघांनी पहिला एकदिवसीय सामना खेळला आहे.
भारताने एकही मालिका गमावली नाही –
उभय संघांमध्ये आतापर्यंत पाच द्विपक्षीय मालिका झाल्या आहेत, ज्यामध्ये श्रीलंकेने एकही मालिका जिंकलेली नाही. भारताने पाचपैकी चार मालिका जिंकल्या आहेत आणि एक अनिर्णित राहिली आहे. भारताने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची मालिका खेळली होती, ज्यामध्ये दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकून बरोबरी साधली होती. २०१६ मध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला होता.
हेही वाचा – Sania Mirza Retirement: ‘या’ स्पर्धेनंतर निवृत्त होणार’, टेनिसपटू सानिया मिर्झानं घेतला मोठा निर्णय!
भारताने दोनदा केला आहे क्लीन स्वीप –
२०१७ मध्ये तिसरी टी-२० मालिका झाली ज्यामध्ये भारताने क्लीन स्वीप केला आणि मालिका ३-० ने जिंकली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी टी-२० मालिका २०२० मध्ये झाली. या मालिकेत तीन टी-20 सामने झाले, ज्यामध्ये पुन्हा भारत २-० असा विजयी झाला आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोघांमधील पाचवी मालिका २०२२ मध्ये झाली, ज्यामध्ये भारताने मालिका ३-० ने जिंकली आणि दुसऱ्यांदा श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केला.