Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka: अखेर आशिया चषक २०२३ची सांगता झाली. १९ दिवस चाललेल्या या स्पर्धेत १३ सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव ५० धावांवर आटोपला. भारताने ६.१ षटकात १० विकेट्स राखून सामना जिंकला.

आशियाई क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१७ सप्टेंबर) खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला. भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले होते. गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे.

ENG vs SL 3rd Test Highlights Pathum Nissanka century r
ENG vs SL 3rd Test : पाथुम निसांकांच्या खणखणीत शतकासह श्रीलंकेने संपवला इंग्लंडमधला विजयाचा दुष्काळ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Bangladesh beat Pakistan by 6 wickets
WTC Points Table : पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशची मोठी झेप, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही टाकलं मागे
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम
Mushfiqur Rahim player of match prize money donates
PAK vs BAN : पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मुशफिकर रहीमने घेतला मोठा निर्णय, जिंकली चाहत्यांची मनं
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय

भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला, टीम इंडिया आठव्यांदा चॅम्पियन बनली

आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले. यापूर्वी भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारताने ही स्पर्धा वन डेमध्ये सात वेळा आणि टी२०मध्ये एकदा जिंकली आहे, तर श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेने वनडेमध्ये पाच वेळा आणि टी२०मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी कहर केला. मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या झंझावाती गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव १५.२ षटकांत ५० धावांवर आटोपला. सिराजने सहा, तर हार्दिकने तीन बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या ३७ चेंडूत सामना जिंकला. टीम इंडियाने १० गडी राखून फायनल जिंकली. शुबमन गिल १९ चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला आणि इशान किशन १८ चेंडूत २३ धावा करून नाबाद राहिला. शुबमनने सहा चौकार आणि इशानने तीन चौकार मारले.

हेही वाचा: Asia Cup Final 2023 IND vs SL: मोहम्मद सिराजच्या सहाही विकेट्सचा VIDEO बघा एका क्लिकवर

या विजयासह भारताचा बहुराष्ट्रीय स्पर्धांमधील पाच वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळही संपुष्टात आला आहे. आशिया चषक २०२३ पूर्वी भारताने शेवटचा आशिया कप २०१८ मध्ये जिंकला होता. तेव्हाही कर्णधार रोहित शर्माच होता. आजही त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कप चॅम्पियन बनली आहे. २०१८ आशिया चषकापासून, भारत महत्त्वपूर्ण सामने आणि प्रसंगांवर वर्चस्व राखण्यात अपयशी ठरला होता. भारताने २०१९ एकदिवसीय विश्वचषक आणि २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि २०२३ WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले. गेल्या वर्षीच्या आशिया चषकात श्रीलंकेने जेतेपद पटकावले होते त्यातही संघ आपली उपस्थिती जाणवू शकला नाही. २०२२ मध्ये आशिया चषक टी२० फॉरमॅटमध्ये खेळला गेला.