Virat Kohli-Ishan Kishan Dance: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय नोंदवला. भारतीय गोलंदाजांनी प्रथम श्रीलंकेचा संघ ३९.४ षटकांत २१५ धावांत गुंडाळला. यानंतर संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या यष्टीरक्षक केएल राहुलने शानदार फलंदाजी करत सामना जिंकला. या विजयासह संघाने मालिकेवर कब्जा केला. यानंतर ईडन गार्डन्समध्ये स्लाईड आणि साउंड शो आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये विराट कोहली आणि इशान किशनने जबरदस्त ‘झिंगाट’ डान्स करून लोकांचे मनोरंजन केले.

व्हिडिओमध्ये फिल्डिंग करताना विराट कोहली सलमान खानच्या सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यानंतर चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. त्याचवेळी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युवा फलंदाज इशान किशननेही विराटसोबत डान्स केला. दोन्ही खेळाडूंचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. इशान किशन आतापर्यंत या मालिकेत प्लेइंग-११ चा भाग झालेला नाही. त्याने गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून अनेक मोठे विक्रम मोडीत काढले होते.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

विराट-इशानने सामन्यानंतर ठुमके देत केला डान्स

२०२३ मध्ये खेळली गेलेली पहिली एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय शिबिरात आनंदाची लाट उसळली आणि हा विजय खास बनवण्यासाठी ईडन गार्डन्समध्ये संगीत सुरू झाले आणि सर्वांनी खूप आनंद साजरा केला. यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इशान किशन आणि विराट कोहली नेत्रदीपक स्टेप्स करून लोकांचे मनोरंजन करत आहेत. या दोघांचा डान्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या मालिकेत संधी न मिळाल्याने इशान किशनने बॅटने चमत्कार केला नसेल पण त्याने या नृत्याने सर्वांची मने नक्कीच जिंकली.

हेही वाचा: IND vs SL: “मला हे माहित नव्हते धन्यवाद…” युजवेंद्र चहलच्या ‘गुगलीवर’ कुलदीप झाला ‘क्लीन बोल्ड’ Video व्हायरल

विराट कोहलीने २०२३ मध्ये चांगली सुरुवात केली

टीम इंडियाच्या माजी कर्णधारासाठी तीन वर्षे खूप वाईट होती. पण २०२२ मध्ये त्याचे ‘रन मशीन’ पुन्हा सुरू झाले आहे. तीन वर्षांनंतर आशिया चषकादरम्यान कोहलीने शतकाचा दुष्काळ संपवला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्येही त्याने शानदार शतक झळकावले. त्याचबरोबर कोहलीने २०२३ ची सुरुवातही शानदार शतकाने केली आहे.

Story img Loader