यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत-श्रीलंका अशी लढत होत आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे भारत फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दरम्यान, भारताची सुरुवात खराब झाली. केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आलेली असताना राहुल स्वस्तात बाद झाला. विशेष म्हणजे राहुलला बाद दिल्यानंतर रोहितच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसली.
हेही वाचा >>> Arshdeep Singh : अर्शदीपला ट्रोल करणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर, क्रिकेटचा देव म्हणाला ‘देशासाठी खेळताना…’
सलामीला आल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध पवित्रा घेत धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच षटकात केएल राहुल पायचित झाला. पंचाने बाद दिल्यानंतर राहुलने रिव्ह्यू घेतला. चेंडू खरंच पायाला लागला का हे पाहण्यासाठी पंचाने बराच वेळ घेतला. नाराजी व्यक्त करत रिव्ह्यू घेतल्यानंतर रोहित आणि राहुलमध्ये चर्चा झाली. मात्र शेवटी त्याला बाद देण्यात आले. राहुलला बाद दिल्यानंतर रोहितने डोळे बंद करून दु:ख व्यक्त केले.
हेही वाचा >>> आधी म्हणाला फक्त धोनीचा मेसेज आला, आता पुन्हा केलं मोठं विधान; विराटच्या नव्या पोस्टची चर्चा
दरम्यान, केएल राहुल बाद झाल्यानंतर लगोलग विराट कोहलीही शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र रोहित शर्माने कर्णधार म्हणून आपली भूमिका चोखपणे पार पाडली. त्याने ४१ चेंडूंमध्ये चार षटकार आणि ५ चौकार लगावत ७२ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच भारताला १७३ धावसंख्या गाठता आली.