IND vs SL, Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत आठव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव १५.२ षटकांत ५० धावांवर आटोपला. मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने हा सामना ६.१ षटकांत म्हणजे अवघ्या ३७ चेंडूत जिंकला. शुबमन गिल १९ चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला आणि इशान किशन १८ चेंडूत २३ धावा करून नाबाद राहिला. सामन्यानंतर श्रीलंकेच्या चाहत्यांना भावना अनावर झाले. त्यांच्या हावभावांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय अंतिम फेरीतील चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय

भारताने कोणत्याही एकदिवसीय फायनलमध्ये शिल्लक चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आशिया कपच्या फायनलमध्ये २६३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २००३ मध्ये सिडनी येथे झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध २२६ चेंडू राखून सामना जिंकला होता.

वन डे फायनलमध्ये तिसऱ्यांदा १० गडी राखून विजय मिळवला

त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यात चेंडू शिल्लक असताना हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने २००१ मध्ये ब्लोमफॉन्टेन येथे केनियाविरुद्धचा सामना २३१ चेंडू शिल्लक असताना जिंकला होता. वनडे फायनलमध्ये संघाने १० गडी राखून सामना जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी टीम इंडियाने १९९८ मध्ये शारजाहमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि २००३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवला होता.

श्रीलंकेच्या चाहत्यांना भावना अनावर

आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीने गाजवला. भारताचा हुकमी एक्का मोहम्मद सिराजने लंकेला नेस्तनाबूत केले. नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकन कर्णधार दासुन शनाका याचा निर्णय सिराजने सपशेल चुकीचा ठरवला. त्याने श्रीलंकेच्या टॉप ऑर्डर फलंदाजांना धडकी भरवणारी गोलंदाजी करत गुडघे टेकायला भाग पाडले. सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेची टॉप ऑर्डर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सिराजची गोलंदाजी आणि श्रीलंकेची स्थिती पाहून यजमानांचे चाहतेही रडू लागले. आता यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: IND vs SL Asia Cup: आशिया कप जिंकल्यानंतर इशान किशनने मानले रोहितचे आभार; म्हणाला, “इच्छा असेल तर…”

श्रीलंका संघाचा डाव असा कोसळताना पाहून चाहत्यांनाही गहिवरून आले. आपल्या संघाची अशी दयनीय अवस्था पाहून काही काही चाहते रडू लागले. त्यांचा यादरम्यानचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांना त्यांच्या गोलंदाजांवर विश्वास बसत नव्हता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl asia cup after mohammad siraj excellent bowling fans shed tears after sri lankas defeat watch video avw