Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka : आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन संघ आशिया चषक उंचावण्यासाठी कोलोंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने शनाकाचा हा निर्णय पहिल्याच षटकात चुकीचा ठरवला. बुमराहने पहिल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर कुसल परेरा याला यष्टीरक्षक लोकेश राहुलकरवी झेलबाद केलं. त्यापाठोपाठ मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या संघाचं कंबरडं मोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोहम्मद सिराजने सामन्यातील चौथ्या आणि वैयक्तिक दुसऱ्याच षटकात श्रीलंकेला मोठा धक्का दिला. या षटकात सिराजने चार बळी घेतले. या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने सलामीवीर पाथम निसंका याला रवींद्र जाडेजाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या सदीरा समरविक्रमा याने सिराजचा उसळता चेंडू सोडून दिला. परंतु, पुढच्याच चेंडूवर सिराजने समरविक्रमाला पायचित पकडलं. त्यापाठोपाठ मैदानात आलेल्या चरीत असलंका यालाही सिराजने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. असलंका बाद झाल्यावर धनंजय डीसिल्व्हा मैदानात आला. डीसिल्व्हाने सिराजला षटकातील पाचव्या चंडूवर शानदार चौकार लगावला. मात्र पुढच्या आणि षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने डीसिल्व्हाला यष्टीरक्षक लोकेश राहुलकरवी झेलबाद केलं.

भारत १३ जुलै १९७४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय सामने खेळतोय. परंतु, गेल्या ४९ वर्षांमध्ये एकाही भारतीय गोलंदाजाला एका षटकात ४ बळी घेता आले नाहीत. ही कामगिरी मोहम्मद सिराजने आज करून दाखवली.

दरम्यान, १५.२ षटकात श्रीलंकेचा डाव संपुष्टात आला आहे. श्रीलंकेचा संघ सर्व गड्यांच्या बदल्यात केवळ ५० धावा करू शकला. मोहम्मद सिराजने ७ षटकांमध्ये २१ धावा देत ६ बळी घेतले. हार्दिक पांड्याने श्रीलंकेचे तीन फलंदाज बाद केले तर एक बळी जसप्रीत बुमराहने घेतला.