रोहित शर्माचा कठोर निर्णय केएल राहुलच्या कामी आला आणि त्याचा भारतालाही फायदा झाला. राहुललाही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते कारण त्याला पॅड लावून फलंदाजीला जाण्याची घाई नसते तर सुरुवातीचे काही गडी बाद होतात तोपर्यंत विश्रांतीसाठी वेळ मिळतो. सामन्यातील परिस्थिती पाहता संघातील भूमिका निभावता येते असे मत राहुलने सामना संपल्यानंतर व्यक्त केले.
वरिष्ठ फलंदाज लोकेश राहुलने सूचित केले आहे की कर्णधार रोहित शर्माने पाचव्या क्रमांकावर संघाचा मुख्य फलंदाज व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे मधल्या षटकांमध्ये त्याची फलंदाजी सुधारेल आणि विकेटकीपर फलंदाजाला फिरकीविरुद्ध चांगली फलंदाजी करण्यास मदत होईल. राहुलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६४ धावा केल्याने भारताने श्रीलंकेचा चार विकेट्सने पराभव केला.
सामन्यानंतर राहुल म्हणाला, “पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने मला माझा खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली. पाचव्या क्रमांकावर, खेळपट्टीवर प्रवेश करताच तुम्हाला फिरकी गोलंदाजीचा सामना करावा लागतो. मला सुरुवातीला चेंडू बॅटवर येतो तेव्हा आवडतो पण कर्णधार रोहितला असे स्पष्ट वाटत होते की मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी, म्हणून मी तसा प्रयत्न करत आहे.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आवडत असल्याचे सांगताना तो म्हणाला, “पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला घाई करण्याची गरज नाही. तुम्ही आंघोळ करू शकता, पाय वर ठेवून आरामात बसून सामना पाहू शकता. गमतीचा भाग सोडला तरी पण मी नेहमी विचार करतो की संघाला माझ्याकडून काय हवे आहे. जर तुम्ही परिस्थिती पाहून मैदानात उतरलात तर ते तुम्हाला आणि संघाला मदत करते.”
हेही वाचा: IND vs SL 2nd ODI: हार्दिक-विराट मध्ये बेबनाव? सोशल मीडियावर चाहत्यांनी उठवल्या वावड्या
राहुल म्हणाला की, भारत सुरुवातीला २८०-३०० धावांचा पाठलाग करू पाहत होता कारण फलंदाजीसाठी ही विकेट चांगली होती. श्रीलंकेला ३९.४ षटकांत २१५ धावांत गुंडाळण्याचे श्रेय त्याने यजमानांच्या गोलंदाजांना दिले. तो म्हणाला, “मी असे म्हणणार नाही की ती सपाट विकेट होती किंवा त्यामुळे गोलंदाजांना खूप मदत होत होती आणि फलंदाजी करणे अशक्य होते. जेव्हा श्रीलंकेने सुरुवात केली तेव्हा मला वाटले की ते २८० ते ३०० धावांची खेळपट्टी आहे. परंतु आमच्या गोलंदाजांनी त्यांना २२० च्या आसपास रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी केली.”