शनिवारी (७ जानेवारी) राजकोट येथे खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी, भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने मुंबई आणि पुणे येथील दोन खराब खेळीनंतर गिलला या निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात यावे, असे धाडसी विधान केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसीम जाफर ईएसपीएन क्रिकइन्फो वर म्हणाला, “मला वाटते ऋतुराज गायकवाडला संधी मिळायला हवी. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो अप्रतिम खेळला होता. दुसरीकडे, शुबमन गिल मागील दोन सामन्यांमध्ये फारसा फॉर्मात दिसला नाही. त्याने चाहत्यांची निराशा केली आहे. मला ऋतुराज गायकवाडला संधी देण्याचा मोह होतो. तो बराच आधीपासून बेंचवर बसून आहे.”

हेही वाचा: IND vs SL T20: “हार्दिकला जुनी व्यवस्था बदलण्याचा अतिआत्मविश्वास…” जडेजाच्या प्रश्नाला कार्तिकने दिले हे उत्तर

तो पुढे म्हणाला, “गोलंदाजी विभागात, मी अर्शदीप सिंगला तो विस्मरणात टाकणारा दिवस (दुसऱ्या T20I मध्ये) पाहता पाठीशी घालीन. या परिस्थितीत तुम्ही त्याला साथ देणे आवश्यक आहे जेणेकरून त्याच्या आत्मविश्वासाला आणखी धक्का बसणार नाही. फलंदाजी विभागातील एका बदलाशिवाय मला इलेव्हनमध्ये इतर कोणतेही बदल दिसत नाहीत.” माजी भारतीय सलामीवीर पांड्याने मावीऐवजी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करावी अशी अपेक्षा आहे, कारण या वेगवान गोलंदाजाने अद्याप डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी कामगिरी केली नाही. मात्र, हार्दिकने विश्वास दाखवून नवीन चेंडू मावीकडे सोपवायला हवा, असे जाफरला वाटते.

वसीम जाफरने ईएसपीएन क्रिकइन्फो वर सांगितले, “मला डेथ ओव्हर्समध्ये मावीऐवजी हार्दिकने गोलंदाजी करावी अशी अपेक्षा आहे. मावीला डेथमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा अनुभव अजून मिळालेला नाही. असे हार्दिकला वाटते. मला वाटते की त्याने ते २० वे षटक टाकले असते.” जाफर पुढे म्हणतो, “मागच्या सामन्यात मला आश्चर्य वाटले जेव्हा सहाव्या षटकानंतर अर्शदीप सिंगला गोलंदाजी दिली नाही. तो कदाचित मधल्या षटकांमध्ये एक किंवा दोन षटके टाकेल आणि नंतर डेथमध्ये गोलंदाजी करेल असे वाटले होते. तसेच, अर्शदीपला फक्त दोन षटके दिल्याने हार्दिकची चूक झाली.”

हेही वाचा: Rishabh Pant Surgery: ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, रिकव्हरी संदर्भात डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

तो म्हणाला, “शिवम मावीने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे, त्याने नवीन चेंडूने गोलंदाजी का केली नाही? तुम्ही अर्शदीपला तिसरे किंवा चौथे षटक देऊ शकता. तरीही अर्शदीपने जे केले ते मान्य नाही. पण मला वाटतं हार्दिकने मावीवर विश्वास ठेवायला हवा होता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl if the opener should be given a chance to this player instead of shubman last over wasim jaffer gives team india success mantra avw