IND vs SL T20I Series Live Streaming Details: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप देत शानदार विजय मिळवला. नव्या टी-२० कर्णधारानंतर आता कर्णधार रोहित शर्मा पुन्हा मैदानावर उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून म्हणजेच २ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामने सुरू होतील. पण या मालिकेचे सामने कोणत्या स्पोर्ट्स चॅनेलवर लाइव्ह पाहता येणार आहेत, जाणून घ्या.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 7: मनू भाकेर-ईशा सिंगच्या नेमबाजी स्पर्धेला सुरूवात; लक्ष्य सेन, हॉकी संघही उतरणार मैदानात

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Raj Thackeray Election
Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी

कर्णधार रोहित शर्मा आणि नवे कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला शुक्रवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत यष्टीरक्षक कोण असणार, याचा गुंता सोडवायचा आहे. डावखुरा फलंदाज ऋषभ पंत आणि उजव्या हाताचा फलंदाज केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून शर्यतीत आहेत. दुसरीकडे, वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली थोड्या विश्रांतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहेत. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर दोघांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही.

टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारतीय संघाला नवे प्रशिक्षक मिळाले आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची हा पहिलाच दौरा असणार आहे. बीसीसीआयने या महिन्याच्या सुरुवातीला माजी भारतीय क्रिकेटपटूची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने यंदाचे तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावले.

हेही वाचा – Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य

IND vs SL T20I Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचं लाइव्ह स्ट्रीमिंग


भारत विरुद्ध श्रीलंकामधील टी-२० आणि वनडे मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात SonyLIV ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. पण हे सामने पाहण्यासाठी सोनी स्पोर्ट्सचे सबस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे. भारत-झिम्बाब्वे मालिकाचे लाइव्ह स्ट्रीमिंगही SonyLIV ॲपवर होते.

हेही वाचा – Olympic 2024: कोण आहे सरबज्योत सिंग? फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न पाहणारा कसा झाला ऑलिम्पिक विजेता नेमबाज?

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, अक्षर पटेल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई , खलील अहमद.

IND vs SL ODI Timetable: भारत-श्रीलंका वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना – २ ऑगस्ट – दुपारी २.३० वाजता, कोलंबो
दुसरा एकदिवसीय सामना – ४ ऑगस्ट – दुपारी २.३० वाजता, कोलंबो
तिसरा एकदिवसीय सामना – ७ ऑगस्ट – दुपारी २.३० वाजता, कोलंबो