India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. सामन्यादरम्यान भारतीय फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. यामुळेच ३५८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १३.२ षटकात अवघ्या ५५ धावांवर गडगडला.

भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला आहे. या विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य आहे. भारताने सलग सातवा सामना जिंकून १४ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा एकतर्फी विजय मिळवला आहे. यापूर्वी आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला ५० धावांत गुंडाळून सहज विजय मिळवला होता.

India Women vs New Zealand Women match highlights in marathi
IND W vs NZ W : टीम इंडियाचा सलामीच्या सामन्यात दारुण पराभव, न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारताची उडाली भंबेरी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Tim Southee quits New Zealand Test captaincy Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: भारत दौऱ्यापूर्वी टीम साऊदीकडून न्यूझीलंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा, ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान
IND vs BAN 2nd Test Highlights in marathi
IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर ‘बॅझबॉल’ शैलीत मालिका विजय, ऐतिहासिक विजयासह घरच्या मैदानावर केला विक्रम
IND vs BAN 2nd Test Match Updates in Marathi
IND vs BAN : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला नवा विश्वविक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
T20 World Cup INDW beat WIW by 20 Runs in Womens World Cup Warm Up Match
Women’s T20 World Cup: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची जोरदार तयारी, पहिल्या सराव सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनचा केला पराभव; जेमिमा-पूजाची चमकदार कामगिरी
WTC Points Table Sri Lanka Beat New Zealand and Improve PCT on 3rd Spot
WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय
Virat Kohli Naagin Dance Video Viral He Mocks Bangladesh with Snake Pose in IND vs BAN
VIDEO: विराट कोहलीचा फिल्डिंग करतानाचा नागिन डान्स व्हायरल, बांगलादेशला त्यांच्याच स्टाईलमध्ये चिडवलं?

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत आठ गडी गमावून ३५७ धावा केल्या. शुबमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ ५५ धावा करू शकला. कसून राजिताने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्यांच्याशिवाय महिष तिक्षिना आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी १२ धावा केल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. त्याचवेळी आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला. मोहम्मद सिराजने तीन तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs SL: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकर यांचा १६ वर्षे जुना विश्वविक्रम! तब्बल ‘इतक्या’ वेळा केल्या एका वर्षात १००० धावा

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला दिलशान मदुशंकाने क्लीन बोल्ड केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी केली. मधुशंकाने ही भागीदारी तोडली. त्याने ९२ धावांवर शुबमनला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकडे झेलबाद केले. शुबमन ९२ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर विराटचे शतकही हुकले. मधुशंकाने त्याला निसांकाकडून झेलबाद केले.

हेही वाचा – IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध श्रेयस अय्यरने पाडला षटकारांचा पाऊस, रोहित शर्मा आणि कपिल देवच्या ‘या’ विक्रमाशी साधली बरोबरी

विराटने ९४ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ८८ धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने ४६ चेंडूत ६० धावांची शानदार भागीदारी केली. राहुल १९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले. सूर्यकुमार यादव काही विशेष करू शकला नाही. तो नऊ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक झळकावले. मधुशंकाने श्रेयसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो ५६ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८२ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमी दोन धावा करून बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने २४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली. भारतीय डावातील शेवटच्या चेंडूवर जडेजा धावबाद झाला. श्रीलंकेकडून मधुशंकाने पाच, तर चमीराला एक विकेट मिळाली.