India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: टीम इंडिया आपला पुढील सामना म्हणजेच एकदिवसीय विश्वचषकातील सातवा सामना गुरूवार, २ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला उपलब्ध असणार नाही. तसेच खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या श्रेयस अय्यरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय इशान आणि सूर्याबाबतही काही निर्णय घेतले जाऊ शकतात. भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूर्यकुमार यादवला मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी –

हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांचा संघात समावेश करण्यात आला होता. न्यूझीलंडविरुद्ध सूर्या २ धावांवर धावबाद झाला. पण इंग्लंडविरुद्ध त्याने ४९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. दुसरीकडे, शमीने दोन सामन्यांत ९ विकेट घेतल्या आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्ध पाच आणि इंग्लंडविरुद्ध चार बळी घेतले. याचा अर्थ आता हार्दिकच्या पुनरागमनानंतर या दोघांनी चांगली कामगिरी करत राहिल्यास या खेळाडूंना वगळणे कठीण होईल.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या खेळपट्टीचा अहवाल –

वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना खूप मदत मिळते. लहान सीमारेषेमुळे, येथे मोठे शॉट्स पाहायला मिळतात. तसेच या खेळपट्टीवर गोलंदाज नेहमीच संघर्ष करताना दिसतात. मात्र, गोलंदाजांना सुरुवातीला स्विंगसह बाऊन्सही मिळतो. येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो. चाहत्यांना वानखेडेवर उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण १६७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने ९८ आणि श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. मात्र, विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये समतोल राखण्यात आला आहे. दोन्ही संघांनी ४-४ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – IND vs SL, World Cup 2023: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या करणार का पुनरागमन? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, मोहम्मद शमी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव.

श्रीलंका संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार), पथुम निसांका, कसून रजिथा, डीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, महिश थेक्षाना, दिलशान मदुशंका, अँजेलो मॅथ्यूज, दुस्मिन्था चमीरा.