Rohit Sharma Breaks Shahid Afridi’s Most Sixes Record in Asia Cup: भारतीय कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध ४८ चेंडूत ५३ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले. यासोबतच भारतीय कर्णधाराने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, रोहित शर्मा आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता. पण आता रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे.

रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीला टाकले मागे –

रोहित शर्माने आशिया कपमध्ये २८ षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर आता शाहिद आफ्रिदी दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावावर २६ षटकार आहेत. रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांच्याशिवाय श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया कपमध्ये सनथ जयसूर्याच्या नावावर २३ षटकार आहेत. या यादीत पुढे माजी भारतीय खेळाडू सुरेश रैना आहे. सुरेश रैनाने आशिया कपमध्ये १८ षटकार ठोकले होते.

IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
maharashtra vidhan sabha election 2024 hasan mushrif vs samarjit ghatge
लक्षवेधी लढत : मुश्रीफ- घाटगेंमध्ये पुन्हा लढत फक्त पक्ष बदलून
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. आशिया चषक सुपर फोर फेरीतील भारतीय संघाचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाचा २२८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. भारत-श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारतीय संघाने सर्वबाद २१३ धावा केल्या. त्याचबरोबर श्रीलंकेसमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

हेही वाचा – IND vs SL: दुनिथ वेल्लालगेने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना केले चकित, पाच विकेट्स घेत रचला इतिहास

सलामीवीर म्हणून रोहित शर्मा सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला –

या सामन्यात रोहित शर्माने ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ५१ वे अर्धशतक आहे. या खेळीच्या जोरावर रोहित शर्माने सलामीवीर म्हणून आपल्या ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर तो सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने एकदिवसीय सामन्यातील १६० डावांत हा कारनामा केला आहे. या बाबतीत त्याने हाशिम आमलाचा ​​विक्रम मोडला. आमलाने १७३ डावात ही कामगिरी केली होती. तर सचिन तेंडुलकरने १७९ डावात ही कामगिरी केली होती.