भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षातील त्यांच्या अभियानाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघांतील टी२० मालिका ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा टी२० मालिकेत खेळणार नसल्यामुळे हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय संघ २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेने करणार आहे. ३ जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले आहे. ‘मिशन २०२४’ साठी टीम तयार करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज-अमेरिकेत टी२० विश्वचषक होणार आहे. त्या स्पर्धेत हार्दिक टीम इंडियाचे नेतृत्व करेल अशी दाट शक्यता आहे.
भारतीय संघातील ‘बिग-थ्री’ रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. अशा स्थितीत संघावर हार्दिकची छाप पूर्णपणे दिसून येईल. यावर्षी भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाचे संपूर्ण लक्ष त्या स्पर्धेवर आहे. त्यासाठी व्यवस्थापनाने १ जानेवारीला बैठक घेऊन रोडमॅपही तयार केला. त्याचे लक्ष टी२० सामन्यांवर कमी आहे. कोहली, रोहित आणि राहुल यांनाही छोट्या फॉरमॅटपासून दूर ठेवता येईल. अशा परिस्थितीत हार्दिकला संघ तयार करण्याची पूर्ण संधी असेल.
आक्रमकतेचा अभाव ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या
भारताच्या नुकत्याच झालेल्या टी२० सामन्यांमध्ये संघ आक्रमकतेने खेळत नाही, हे दिसून आले आहे. त्याची उणीव फलंदाजी आणि गोलंदाजीत दिसून आली आहे. यामुळे टीम इंडियाला लागोपाठ दोन टी२० विश्वचषकात आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आली नाही. हार्दिकने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत सरासरी संघाला चॅम्पियन बनवून स्वतःला सिद्ध केले आहे. आता तो ‘न्यू टीम इंडिया’ला आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी कसे प्रोत्साहन देऊ शकतो हे पाहावे लागेल.
टीम कॉम्बिनेशनवर असणार सर्वाची नजर
कार अपघातानंतर ऋषभ पंत बराच काळ संघाबाहेर आहे. मात्र, श्रीलंकेविरुद्धही त्याची निवड झाली नाही. विकेटकीपिंगसाठी इशान किशनसोबतच संघ व्यवस्थापन संजू सॅमसनवर विश्वास ठेवेल, किशनलाही सलामी देताना पाहता येईल. त्याच्यासोबतच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या टी२० मध्ये ऋतुराज गायकवाडचाही प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. गेल्या काही वर्षांत दोघांनी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. आता या दोघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र दाखवण्याची पुरेशी संधी मिळू शकते.
पुढील टी२० विश्वचषक किमान १८ महिन्यांवर आहे. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकमुळे टीम इंडिया १५ पेक्षा कमी टी२० सामने खेळणार आहे. किशन आणि ऋतुराजशिवाय हार्दिकसाठी आणखी एक सलामीचा पर्याय आहे. शुभमन गिलचे अद्याप टी२० मध्ये पदार्पण व्हायचे आहे, पण सलामीला तो संघाचा पर्याय बनू शकतो. तिसऱ्या क्रमांकावर हार्दिकची भिस्त जगातील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादववर असेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये सहा गोलंदाजी पर्याय ठेवण्याची हार्दिकची इच्छा पाहता, दिपक हुडाला पहिल्या टी२० मध्ये संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे.
सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांच्यात रस्सीखेच
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल बोलताना हार्दिकसमोर संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठीपैकी कोणाचा संघात समावेश करायचा हे मोठे आव्हान आहे. मधल्या फळीत सॅमसन किंवा त्रिपाठीपैकी एकालाच संधी दिली जाऊ शकते. त्रिपाठी टीम इंडियामध्ये सामील झाला आहे, पण त्याला अद्याप प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळालेले नाही. आणखी काही सामन्यांसाठी त्याला बेंचवर बसावे लागेल असे दिसते. अनुभवी सॅमसनसोबतच टीम इंडियाला या सामन्यात उतरायला आवडेल.
मावी-मुकेशला वाट पाहावी लागेल
गोलंदाजीमध्ये हार्दिक अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि उमरान मलिकसह पहिल्या टी२०मध्ये प्रवेश करू शकतो. आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या शिवम मावी आणि मुकेश कुमार यांना प्रतीक्षा करावी लागेल. फिरकी अष्टपैलू खेळाडूसाठी संघाकडे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे पर्याय आहेत. त्याचबरोबर अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहलचे खेळणे निश्चित असल्याचे मानले जात आहे.