IND vs SL Mohammed Siraj Kusal Mendis Controversy : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज मैदानात असेल तर कधीही काहीही होऊ शकते. सिराज आपल्या धारदार गोलंदाजीने विकेट घेण्यासाठी ओळखला जात असला तरी काही वेळा तो आपली आक्रमक वृत्तीही दाखवतो. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात असेच काहीसे पाहिला मिळाले. या सामन्यात मोहम्मद सिराज आणि श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस यांच्यात लाइव्ह सामन्यात जुंपली. यानंतर दोघे एकमेकांना खुन्नस देताना दिसले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा सर्व प्रकार सामन्याच्या ३९व्या षटकात घडला –

वास्तविक, सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर श्रीलंकेच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. डावाची ३८ षटके पूर्ण झाली होती आणि श्रीलंकेच्या संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात १३८ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने ३९ वे षटक मोहम्मद सिराजकडे सोपवले. दरम्यान, या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सिराज आणि कुसल मेंडिल यांच्यात शाब्दिक वाद झाला. मोहम्मद सिराजचा हा चेंडू ताशी १३५ किलोमीटर वेगाने फेकला गेला. हा एक स्किड बॉल होता, जो थोडा खाली राहिला. मेंडिसने वेळीच बॅट खाली केली आणि चेंडू रोखला. यानंतर सिराज आणि मेंडिस एकमेकांना खुन्नस देताना दिसला. ही घटना काही सेकंद चालू होती आणि त्यानंतर सिराज परत त्याच्या रनअपवर परतला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

त्याच षटकात सिराजने समरविक्रमाला केले बाद –

विशेष म्हणजे याच षटकात सिराजनेही एक विकेट घेतली. मात्र, बाद झालेला फलंदाज मेंडिस नव्हता. त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर मेंडिसने एक धाव घेतली आणि तो दुसऱ्या टोकाला गेला. ज्यामुळे चेंडूचा सामना करण्यसाठी समरविक्रमा सिराजसमोर होता. हा चेंडू ताशी १३९ किलोमीटर वेगाने टाकला गेला आणि समरविक्रमाला एलबीडब्ल्यू आऊट झाला. सिराजने यॉर्कर चेंडूवर मोठे अपील केले. विराट कोहली आणि सिराजला ते बाद झाल्याचं वाटत होतं, पण यष्टीरक्षक ऋषभ पंतने त्यात रस दाखवला नाही. सिराजने कर्णधार रोहितला रिव्ह्यू घ्यायला मनवले. तिसऱ्या पंचांनी तपासले असता समरविक्रमाने घाईघाईत बॅट खाली केल्याचे दिसून आले. अल्ट्राएजने पुष्टी केली आणि बॉल ट्रॅकिंगने दाखवले की चेंडू पायाला लागला होता. जोएल विल्सनने आपला नॉट आऊटचा निर्णय घेतला आणि समरविक्रमा गोल्डन डकवर बाद झाला.

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified : ‘१०० ग्रॅम जास्त वजनाच्या कथेवर तुमचा विश्वास आहे का?’ विनेश फोगटच्या अपात्रतेवर स्वरा भास्करने उपस्थित केला प्रश्न

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना केल्या २४८ धावा –

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीलंकेच्या संघाला आपल्या सलामीवीरांच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कारण संपूर्ण संघ ५० षटकात केवळ २४८ धावाच करू शकला. आता भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर त्याला २४९ धावा कराव्या लागतील. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताला ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता मालिकेत बरोबरी साधायची असेल तर टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हे लक्ष्य गाठावे लागेल.

Story img Loader