IND vs SL Big Blow to Sri Lanka: भारताविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. भारतानंतर या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघही जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही संघ सध्या या मालिकेच्या तयारीत व्यस्त आहेत. तीनपैकी पहिले दोन सामने अवघ्या दोन दिवसांत खेळवले जातील, म्हणजेच २७ आणि २८ जुलैला सलग सामने आहेत. पण यापूर्वी श्रीलंकेचा दुष्मंता चमीरा संघाबाहेर झाला होता, आता त्याच्या पाठोपाठ अजून एक खेळाडू संघाबाहेर झाला आहे.
श्रीलंका संघाचा स्टार वेगवान गोलंदाज नुवान तुषारा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. सरावादरम्यान तुषाराच्या बोटाला दुखापत झाली आणि स्कॅनमध्ये बोटाचे हाड मोडल्याचे समोर आले. त्यामुळे तो एकही सामना खेळू शकणार नाही. त्याच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र दिलशान मधुशंकाचा संघात समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.
IND vs SL: दुष्मंता चमीराच्या जागी कोणत्या खेळाडूला मिळाली संधी?
नुवान तुषारापूर्वी दुष्मंथा चमीराही दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. नुवान तुषाराच्या रूपाने श्रीलंकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पण चमीराच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. चमीराला वगळल्यानंतर त्याच्या जागी असिथा फर्नांडोचा संघात समावेश करण्यात आला आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारताविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेसाठी दुष्मंथा चमीरा हा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
हेही वाचा – IPL 2025: फ्रँचायझींच्या तीन मोठ्या मागण्या, ५ वर्षांनी होणार महालिलाव? RTM बाबतही संघमालक आग्रही
T20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ :
चरिथ असलंका, पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालागे, महेश तीक्ष्णा चमिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो आणि असिथा फर्नांडो