भारताने रविवारी रात्री तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. याबरोबरच तीन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांचा ३-० ने धुव्वा उडवला. भारताच्या या विजयाचा नायक विराट कोहली ठरला, त्याने १६६ धावांची नाबाद खेळी साकारली. ज्यामुळे भारताची धावसंख्या ३९० धावांपर्यंत पोहोचली. या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताने श्रीलंकेसमोर ३९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव ७३ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेवर ३१७ धावांनी मोठी विजय मिळवला. या विजयानंतर मैदानावरील खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत होते, तेव्हा विराट कोहलीचा एक चाहता सुरक्षारक्षकांना चकवा देत मैदानात घुसला.

सुरक्षेशी निगडीत बाब असल्याने चाहत्याला अशा पद्धतीने संघाकडे धावताना पाहून सुरुवातीला सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले, पण जेव्हा या चाहत्याने थेट विराट कोहलीच्या पायाला हात लावायला सुरुवात केली, तेव्हा सर्वांना समजले की तो किंग कोहलीचा मोठा चाहता आहे. या चाहत्याने विराट कोहलीच्या पायाला स्पर्श केला आणि त्याच्यासोबत फोटोही काढला. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीसोबत त्या चाहत्याचा फोटो काढून त्याचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या चाहत्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.

या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे, तर विराट कोहली (१६६*) आणि शुभमन गिल (१६६) यांनी शानदार शतके झळकावली. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करताना ३९० धावांचा डोंगर उभारता आला . या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला श्रीलंकेचा संघ अवघ्या ७३ धावांवर गारद झाला.

हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: फक्त धावांचाच नव्हे तर विराटचा आणखी एक विक्रम; पोलार्ड, लाराला मागे टाकत सेहवागशी केली बरोबरी

पाहुण्यांसाठी केवळ तीन फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. यादरम्यान भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराज चमकला, त्याने ४ विकेट्स घेतल्या , तर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी २ विकेट्स घेता आल्या. एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताने श्रीलंकेचा टी-२० मध्ये २-१असा पराभव केला होता.