भारताने श्रीलंकेला टी-२० मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप दिला. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ६ गडी राखून पराभव केला. विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळाडू नव्हे, तर दुसऱ्या एका व्यक्तीकडे ट्रॉफी सुपूर्द केली. अनेकदा संघातील नव्या खेळाडूला ट्रॉफी दिली जाते, मात्र यावेळी मैदानावर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. रोहितने बीसीसीआयचे प्रतिनिधी जयदेव शाह यांच्याकडे ट्रॉफी दिली. जयदेव शाह हे सौराष्ट्रचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांचे पुत्र आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी १२० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २९.९१च्या सरासरीने ५३५४ धावा केल्या. त्यांच्या नावावर १० शतके आणि १२ अर्धशतके आहेत. जयदेव सध्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा आतापर्यंत अपराजित आहे. एवढेच नव्हे, तर त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग चौथ्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप दिला आहे.

हेही वाचा – रणजी क्रिकेट : विष्णू सोलंकीवर कोसळला दु:खाचा डोंगर; लेकीला गमावल्यानंतर आता वडिलांनी घेतला जगाचा निरोप

याआधी भारताने न्यूझीलंडचा टी-२० मालिकेत ३-०असा पराभव केला होता. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२० अशा दोन्ही मालिकेत वेस्ट इंडीजचा ३-० असा पराभव केला. आता श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिका ३-०ने जिंकली. भारताचा हा सलग १२वा टी-२० विजय आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl rohit sharma handed winning trophy to bcci representative jaydev shah adn