IND vs SL ODI Series Rohit Sharma: भारतीय संघ जुलै अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ नवा असणार आहे. तर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची पहिली परिक्षा असणार आहे. याबरोबरच आतापर्यंत श्रीलंका दौऱ्याबाबत बातम्या येत होत्या की कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते, परंतु आता रोहित शर्माच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा – Natasa Stankovic: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा स्टॅनकोविकने लेकासह सोडलं घर, एअरपोर्टवरील VIDEO आला समोर

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
Devendra Fadnavis new Chief Minister of Maharashtra
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड

भारत टी-२० वर्ल्डचॅम्पियन ठरल्यानंतर विश्वचषकानंतर लगेच रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. रोहित एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहणार असला तरी, रोहित शर्माच्या श्रीलंका दौऱ्यावर वनडे मालिकेत खेळण्याबाबत निश्चितता नव्हती. पण आता रिपोर्टनुसार रोहित शर्मा श्रीलंकेविरूद्धची वनडे मालिका खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भारताचे सर्व दिग्गज खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी तिन्ही फॉरमॅटसाठी उपलब्ध असावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी भारतीय संघ काही मोजक्या वनडे मालिका खेळणार आहे, त्यामुळे श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित उपलब्ध असेल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा – Sri Lanka: धक्कादायक! श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या, पत्नी आणि मुलांसमोर घरात झाडल्या गोळ्या

रोहित शर्मा श्रीलंकेविरूद्ध वनडे मालिकेसाठी उपलब्ध असणार

क्रिकबझच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा श्रीलंकेसोबत वनडे मालिकेत खेळू शकतो. रोहितचे वनडे मालिकेत पुनरागमन झाले तर तो पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून दिसणार आहे. या आधी येणाऱ्या बातम्यांनुसार रोहितच्या पुनरागमनाचे कोणतेही अपडेट आले नव्हते, त्यामुळे केएल राहुलला एकदिवसीय मालिकेत कर्णधार बनवले जाऊ शकते अशा बातम्या येत होत्या. पण जर रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असेल तर चाहत्यांना पुन्हा एकदा हिटमॅन संघाचे नेतृत्व करताना दिसेल. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांनाही विश्रांती देण्यात येईल, असे अपडेट आहेत.

टी-२० विश्वचषक २०२४ नंतर, रोहित शर्माने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि सुट्टीसाठी कुटुंबासह अमेरिकेला गेला. सध्या रोहित अमेरिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता, ज्यामध्ये रोहितने त्याच्या एकदिवसीय आणि कसोटी निवृत्तीवर उत्तर दिले होते.

Story img Loader