Indian Cricket Team Schedule of Sri Lanka Tour: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ जुलै आणि ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. जिथे टीम इंडियाला एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. आता बीसीसीआयने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Champions Trophy: भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, BCCI ने ICC समोर मांडला नवा प्रस्ताव

भारत जुलै आणि ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर पल्लेकले आणि कोलंबो येथे तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २६, २७ आणि २९ जुलै रोजी टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर एकदिवसीय मालिकेतील सामने १, ४ आणि ७ ऑगस्टला कोलंबोमधील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील.

टी-२० विश्वचषकानंतर श्रीलंका क्रिकेट संघाचा हा पहिलाच दौरा असेल. श्रीलंकेचा संघ टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकला नाही आणि गट सामन्यातील फेरीत बाहेर पडला. IND vs SL मालिकेपूर्वीच दोन्ही संघांचे प्रशिक्षक बदलले आहेत. गौतम गंभीर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तर सनथ जयसूर्याला श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी मिळाली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. या मालिकेसाठी भारताचे वरिष्ठ खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही मालिकांसाठी संघाचा कर्णधार कोण असणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

हेही वाचा – रोहित-विराट-बुमराह श्रीलंका दौऱ्यावरही संघाचा भाग नसणार, भारताचे हे दिग्गज खेळाडू कधी पुनरागमन करणार? जाणून घ्या

IND vs SL मालिकेसाठी हार्दिक आणि राहुलकडे कर्णधारपद
हार्दिक पांड्याकडे टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची कमान सोपवली जाऊ शकते तर केएल राहुलला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. दरम्यान, श्रीलंकेच्या संघालाही नवा कर्णधार मिळणार आहे कारण वानिंदू हसरंगाने गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

IND vs SL: भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक


टी-२० मालिका

पहिला टी-२० सामना – २६ जुलै – संध्याकाळी ७ वाजता

दुसरा टी-२० सामना – २७ जुलै – संध्याकाळी ७ वाजता

तिसरा टी-२० सामना – २९ जुलै – संध्याकाळी ७ वाजता

हेही वाचा – राहुल द्रविड यांचा मोठा निर्णय, वर्ल्डकप बक्षीसाच्या रकमेतील निम्मी रक्कम घेण्यास नकार? नेमकं कारण काय?

IND vs SL: एकदिवसीय मालिका

पहिला वनडे सामना – १ ऑगस्ट – दुपारी २.३० वाजता

दुसरा वनडे सामना – ४ ऑगस्ट – दुपारी २.३० वाजता

तिसरा वनडे सामना – ७ ऑगस्ट – दुपारी २.३० वाजता

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl series full schedule 3 t20i and 3 odi know the date timings venue india tour of sri lanka bdg