भारताने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फटकेबाजी केली. त्याचबरोबर त्याने यष्टिरक्षण करताना अनेक धावा रोखल्या. त्याने एक अप्रतिम झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक इशानचे कौतुक करत आहेत.
इशानने २९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावांची खेळी खेळली आणि यष्टिरक्षण करताना अनेक धावा रोखल्या. त्याने एक अप्रतिम झेल घेतला, ज्यामुळे त्याच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६२ धावा केल्या होत्या. त्यामुळे श्रीलंका संघाला विजयासाठी १६३ धावांची गरज होती. परंतु श्रीलंकेचा संघ १६० धावांवरच आटोपला. ज्यामुळे भारतीय संघाने २ धावांनी विजयाची नोंद केली.
वास्तविक, इशानने उमरान मलिकच्या चेंडूवर धडाकेबाज फलंदाज चरित अस्लंकाचा शानदार झेल घेतला. आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अस्लंकाने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू फाइन लेगच्या दिशेने गेला. अशा स्थितीत इशानने बिबट्याप्रमाणे चपळाई दाखवत धावायला सुरुवात केली आणि चेंडूजवळ पोहोचला. हर्षल पटेल फाइन लेगवर उपस्थित होता, पण इशानने त्याला हाताने थांबण्याचा इशारा केला आणि नंतर स्वतः उडी मारून झेल घेतला.
इशानने धावत जाऊन ज्याप्रकारे फ्लाइंग कॅच घेतला, तेव्हापासून विकेटकीपरची तुलना एमएस धोनीशी केली जात आहे. इशानमध्ये धोनीची झलक लोकांना पाहायला मिळत आहे. धोनीने २०१८ मध्येही असाच एक झेल पकडला होता.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने हे अप्रतिम झेल घेतला होता. याशिवाय धोनीने अनेक सामन्यांमध्ये अशक्य झेल शक्य करण्याचा पराक्रमही केला आहे.