Dunith Vellalge has become the youngest bowler to take five wickets in ODIs: श्रीलंकेचा २० वर्षीय फिरकी गोलंदाज दुनिथ वेल्लालगेने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंगळवारी कोलंबोमध्ये भारत विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वेल्लालगेने भारताच्या स्टार फलंदाजांना बाद करत सर्वांना चकीत केले. भारतीय डावाची शानदार सुरुवात करणाऱ्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलला त्याने बोल्ड केले. त्याचबरोबर विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या झेलबाद केले. या पाच विकेट्स घेत दुनिथ वेल्लालगेने एक विक्रम केला आहे.
त्याने आपल्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पांड्याला बाद करून टीम इंडियाची फलंदाजी उद्ध्वस्त केली. वेल्लालगेच्या घातक चेंडूला फटकावतानाही प्रत्येक स्टार फलंदाजाला घाम फुटला. या युवा गोलंदाजाने १० षटकात ४० धावा देत ५ बळी घेतले. त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेणारा वेल्लालगे श्रीलंकेचा सर्वात तरुण गोलंदाज –
दुनिथ वेल्लालगेने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसह निम्मा संघ एकट्याने तंबूत पाठवला. या कामगिरीच्या जोरावर दुनिथ वेल्लालगे एकदिवसीय क्रिकेटमध्ये डावात ५ बळी घेणारा तो श्रीलंकेचा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. तसेच, भारताविरुद्ध पाच विकेट घेणारा तो श्रीलंकेचा चौथा फिरकीपटू ठरला आहे. भारताविरुद्धची दुनिथ वेल्लालगेची ही कामगिरी पाहू त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा – IND vs SL: विराट-रोहितने रचला इतिहास, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली जोडी
२० वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम पाहून क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. वेल्लालाघेने गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. कसोटी पदार्पणात त्याला एकही विकेट मिळाली नसली तरी, त्याने एकदिवसीय पदार्पणात चमकदार कामगिरी केली. वेल्लालेने पल्लेकेले येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने २ विकेट घेतल्या. वेल्लालगेने आतापर्यंत १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहे.