IND vs SL Wanindu Hasaranga ruled out of ODI Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघांमध्ये या मालिकेत एक सामना खेळला गेला आहे. जो बरोबरीत सुटला होता. आता मालिकेतील दुसरा सामना ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाला मोठा झटका बसला आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा एक स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा आहे. श्रीलंकेच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये हे उघड झाले आहे. श्रीलंका क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वानिंदू हसरंगा मालिकेतून बाहेर –

श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे भारताविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रीलंका संघात आधीच वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका यांच्या अनुपस्थितीमुळे पोकळी निर्माण झाली होती. अशात आता वानिंदू हसरंगा मालिकेतून बाहेर पडल्याने त्यांचा संघ खूपच अडचणीत सापडला आहे. कारण वानिंदू हसरंगा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि पहिल्या वनडेत त्याने श्रीलंकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने तीन विकेट्स आणि २४ धावांची खेळी साकारत संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र, हॅमस्ट्रिंगची दुखापत त्याच्या फिटनेसमध्ये अडथळा ठरत आहे.

पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला –

भारत आणि श्रीलंका संघांमधील या मालिकेतील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात दोन्ही संघांनी २३० धावा केल्या. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत तीन गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा अशा चांगल्या स्थितीत होता. यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी शानदार कमबॅक करत भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली. ज्यामुळे भारताचा संघ २३० धावांवर गारद झाला. त्यामुळे कोणताही संघ हा सामना जिंकू शकला नाही.

हेही वाचा – IPL 2025 : मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला मेगा ऑक्शनपूर्वी सोडणार? ‘या’ चार खेळाडूंना ठेवणार कायम

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ :

पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, ड्युनिथ वेलागे, वानिंदू हसरंगा, महिष तिक्षाना, अशिथा फर्नांडो, मोहम्मद चनारा, शिराझुना, शिराझुना अकिला धनंजय, कामिंदू मेंडिस, निशान मदुष्का, इशान मलिंगा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl sri lankan spinner wanindu hasaranga ruled out of odi series against india with hamstring injury vbm