भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ९१ धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. असे केल्याने तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला, कारण त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला सलामीशिवाय ३ शतके झळकावता आलेली नाहीत.

सलामीशिवाय शतके झळकावणारा पहिलाच फलंदाज –

भारताचा मिस्टर ३६० डिग्री बॅटर म्हटल्या जाणार्‍या सूर्यकुमार यादवच्या आधी जगात असे फक्त चार क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत, परंतु हे सर्व खेळाडू सलामीला खेळताना शतक झळकावण्यात यशस्वी ठरले आहेत. पण सूर्यकुमार यादवने दोनदा चौथ्या क्रमांकावर आणि एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावले आहे.

हेही वाचा – IND vs SL 3rd T20: जमिनीवर पडत सूर्याने लगावला खणखणीत षटकार, चाहतेदेखील झाले अवाक, पाहा VIDEO

सर्वात जास्त शतके –

भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकले आहे. आता त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतके झळकावली आहेत. सूर्या आता ३ शतकांसह दुसऱ्या तर केएल राहुल २ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याशिवाय सुरेश रैना, दीपक हुडा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl suryakumar yadav first cricketer in the world to score three centuries in t20i without appearing in the opener vbm