शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या टी-२० सामन्यात भारताने ९१ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघासाठी शतकवीर सूर्यकुमार यादवने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारताला २२८ धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्याची शतकी खेळी पाहिल्यानंतर सगळेच त्याचे कौतुक करत होते. अशात माजी खेळाडूने गौतम गंभीरने एक ट्विट केले, ज्यामुळे चाहते त्याच्यावर संतापले.
सूर्याने ५१ चेंडूत ९ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ११२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. यानंतर भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. तसेच तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. दरम्यान माजी खेळाडूने गौतम गंभीरने सूर्याचे कौतुक करताना एक ट्विट केले. ज्यामुळे चाहते त्याच्यावर नाराज झाले.
गौतम गंभीरने ट्विट केले की, ‘किती शानदार खेळी आहे सूर्यकुमार यादव! त्याला कसोटी क्रिकेटमध्ये उतरवण्याची वेळ आली आहे!
गौतम गंभीरच्या या ट्विटवर भारतीय क्रिकेटप्रेमी संतप्त झाले आहेत. खरे तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूपुढे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूला कसोटी संघात संधी का द्यायची, असा युक्तिवाद चाहत्यांनी केला. येथे काही चाहत्यांनी सरफराज खानचे उदाहरण दिले, जो गेल्या काही काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे, तरीही त्याला अद्याप कसोटी संघात स्थान मिळालेले नाही.
एका चाहत्याने ट्विट केले की, ‘गौती तुमच्याकडून चांगली अपेक्षा होती. तुम्ही असा संघ का बनवता? रणजी क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्यांचे काय. उदाहरण सरफराज? पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मच्या आधारे पूर्णपणे वेगळ्या खेळासाठी एखाद्या खेळाडूची निवड झाली, तर ते योग्य उदाहरण ठरणार नाही.
त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले, ”कशाच्या आधारावर? टी-२० मध्ये चांगले खेळणे हा कसोटी निवडीचा निकष आहे का? मग सरफराजसारखे लोक रणजीमध्ये का मेहनत घेत आहेत? सर्व खेळाडू सर्वच फॉरमॅटमध्ये असण्याची गरज नाही. त्याला टी-२० स्पेशालिस्ट होऊ द्या.
हेही वाचा – IND vs SL 3rd T20: जमिनीवर पडत सूर्याने लगावला खणखणीत षटकार, चाहतेदेखील झाले अवाक, पाहा VIDEO