भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेदरम्यान एक मोठी अपडेट समोर आला आहे. शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा समावेश करण्यात आला आहे. तो संघात संजू सॅमसनच्या जागी खेळणार आहे. पीटीआयने बुधवारी रात्री ही माहिती दिली.

मुंबईतील पहिल्या टी-२० सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला दुखापत झाली होती. संजू सॅमसनला झेळ घेताना गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे तो टीम इंडियासोबत पुण्याला जाऊ शकला नाही. दुसऱ्या टी-२० च्या अवघ्या २४ तास आधी टीम इंडियामध्ये हा बदल करण्यात आला आहे. दुसरा टी-२० सामना गुरुवारी म्हणजेच ५ जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Sam Curran England Cricketer Brother Ben Curran Will Play for Zimbabwe Cricket Team
सॅम करनचा भाऊ इंग्लंड नव्हे तर ‘या’ देशाकडून खेळणार क्रिकेट, वनडे मालिकेसाठी संघात निवड
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

कोण आहे जितेश शर्मा?

बारावीपर्यंत शिकलेल्या जितेशचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्याचे वडील मूळचे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील तर आई अमरावती येथील आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळतो. जितेशला विदर्भाच्या रणजी संघातून वगळण्यात आल्याने तो काही काळ डिप्रेशनमध्ये गेला होता.

हेही वाचा – ICC T20I Ranking: आयसीसी क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप, तर दिपक हुडा पुन्हा टॉप १०० मध्ये दाखल

आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने त्याला २० लाखांना विकत घेतले होते –

विदर्भाचा यष्टीरक्षक जितेशने आयपीएलच्या १५ व्या मोसमात पंजाब किंग्जकडून पदार्पण केले. जितेशने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात जवळपास १५३ च्या स्ट्राइक रेटने २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जितेशने आपल्या छोट्या पण उपयुक्त खेळीत ३ षटकार ठोकले. आयपीएल २०२२ च्या लिलावात पंजाब किंग्जने जितेशला 20 लाख रुपयांना सामील केले होते.

यापूर्वी २०१६ मध्ये जितेशला मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते पण तिथे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. नंतर फ्रँचायझीने त्याला सोडले. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जकडून अप्रतिम फलंदाजी केली आहे. आता त्याला टीम इंडियाकडून बोलावणे आले आहे. फिनिशर म्हणून, त्याने अलीकडच्या काळात बरीच सुधारणा केली आहे. जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, तर तो टीम इंडियासाठी या भूमिकेसाठी योग्य असल्याचे सिद्ध करू शकतो.

संजू सॅमसन पहिल्या टी-२० सामन्यात अपयशी ठरला होता. ते केवळ ५ धावा करू शकला होता. जितेश शर्माच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे, तर त्याने ४७ लिस्ट ए सामन्यांमध्ये १३५० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ७६ टी-२० सामन्यांमध्ये १७८७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १२ आयपीएल सामन्यांच्या १० डावात २३४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ४४ आहे.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

Story img Loader