भारत आणि श्रीलंका संघांतील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. तसेच या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू देखील मुंबईत पोहोचले आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा खेळाडू शुबमन गिलचा नवा लूक समोर आला आहे. त्याने आपली हेयर स्टाईल बदलली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल मुंबईत आहे, तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० संघाचा भाग आहे. पहिला सामना मुंबईतच होणार असून, त्यासाठी गिल येथे पोहोचला. संघात सामील होण्यापूर्वी, गिल प्रसिद्ध हेअरकट सलून अलीम हकीम येथे गेला होता, जिथे त्याने नवीन हेयर स्टाईल केली आहे. ज्याचा फोटो हेयर स्टाइलिस्ट अलीम हकीमने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

गिलच्या नवीन हेअरस्टाईलचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अलीम हकीमने लिहिले, ”हे माझे २०२२ वर्षातील शेवटचे कटिंग आहे.” अलीम हकीम सलून खूप प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला माहिती आहेच. बॉलिवूड जगतातील लोकांसोबतच अनेक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्याकडून केस कापून घेतात. यामध्ये हार्दिक पांड्या, एमएस धोनी, विराट कोहली आदींच्या नावांचाही समावेश आहे.

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी आपल्या केसांना नवा लूक दिला आहे. वरून वाढवलेले केस, बाजूने झिरो साईज कटिंग आणि हलकी दाढी यामध्ये गिल खूपच डॅशिंग लूकमध्ये दिसत होता. एका वेबसाइटनुसार, आलम हकीम सलूनमध्ये केस कापण्याची किंमत १८,००० रुपये आहे.

पहिला टी-२० सामना वानखेडेवर होणार –

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडेवर खेळवला जाणार आहे. हा सामना मंगळवार, ३ जानेवारी रोजी वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात होईल. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या आणि दासून शनाका आमनेसामने असतील.

हेही वाचा – ऋषभ पंत आयपीएल २०२३ मधून बाहेर; दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी ‘या’ खेळाडूच्या नावाची चर्चा

भारतीय टी-२० संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.